Helicopter Crash Caught on Camera in Kedarnath: केदारनाथमध्ये लष्कराच्या MI-17 हेलिकॉप्टर कोसळले,अपघाताचा थरार व्हिडिओ व्हायरल

भारतीय लष्कराच्या MI 17 हेलिकॉप्टरद्वारे हेलिकॉप्टरचे उड्डाण केले जात होते. याच दरम्यान हा अपघात झाला. हेलिकॉप्टर सावरण्याचा प्रयत्नात हा अपघात झाला. हेलिकॉप्टर डोंगरात कोसळले.

MI-17 helicopter crashes Photo Credit X

Helicopter Crash Caught on Camera in Kedarnath: उत्तराखंडामधील केदारनाथ धाममध्ये हेलिकॉप्टर कोसळले आहे. भारतीय लष्कराच्या MI 17 हेलिकॉप्टरद्वारे हेलिकॉप्टरचे उड्डाण केले जात होते. याच दरम्यान हा अपघात झाला. हेलिकॉप्टर सावरण्याचा प्रयत्नात हा अपघात झाला. हेलिकॉप्टर डोंगरात कोसळले. या अपघातात व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (हेही वाचा- पुणे येथील पौड परिसरात हेलिकॉप्टर कोसळले)

मिळालेल्या माहितीनुसार, केदारनाथमध्ये उतरताना हेलिकॉप्टरचे नुकसान झाले होते. भारतीय हवाई दलाच्या MI 17 हेलिकॉप्टरद्वारे दुरुस्तीसाठी ते विमानात नेले जात होते. पण उड्डाणादरम्यान हेलिकॉप्टरची टोईग चेन तुटल्याने ते खाली पडले. या अपघातात कोणी जखमी झाले आहे की नाही हे स्पष्ट झालेले नाही.

केदारनाथ की पहाड़ियों में गिरा हेलीकॉप्टर

 

या दुर्घटनेनंतर बचावकार्य वेगाने सुरु करण्यात आले असून परिसराच्या कठीण भूभागामुळे बचाव पथकांना आव्हानांचा सामना करावा लागत आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी आवश्यक उपकरणे आणि अतिरिक्त पथके घटनास्थळी पाठवली आहेत. जेणेकरून अपघाताच्या कारणाचा शोध घेता येईल आणि मदतकार्य सुरळीतपणे पार पाडता येईल.

 



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif