जनरल बिपीन रावत भारताचे पहिले सीडीएस; पहा Chief of Defense Staff या पदाची वैशिष्ट्यंं
पण यापदावरील व्यक्तीच्या नेमक्या जबाबदार्या काय आहेत.
भारताचे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत (Army Chief General Bipin Rawat) आज 'चिफ ऑफ डिफेंस स्टाफ' (Chief of Defense Staff) या पदाचा पदभार सांभाळणार आहेत. भूदल, वायुदल आणु नौदल या तिम्ही संरक्षण दलाच्या वतीने संरक्षण मंत्र्यांचे सल्लागार म्हणून सीडीएस म्हणून लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत काम पाहणार आहे. ही नवी जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी आज बिपीन रावत यांनी शहिदांना आदरांजली अर्पण केली आहे. 'नॅशनल वॉर मेमोरियल'ला भेट देत त्यांनी आपली आदरांजली अर्पण दिली आहे. अभिमानस्पद! महाराष्ट्राचे सुपुत्र मनोज मुकुंद नरवणे आज लष्करप्रमुख पदी स्वीकरणार कार्यभार.
बिपीन रावत सीडीएस चा कार्यभार 1 जानेवारी पासून स्वीकारणार आहेत. पण यापदावरील व्यक्तीच्या नेमक्या जबाबदार्या काय आहेत? सीडीएस हे पद म्हणजे नेमकं काय हे तुम्हांला ठाऊक आहे का?
- 1999 च्या कारगिल युद्धानंतर स्थापन झालेल्या के. सुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखालील समितीने 'सीडीएस' या पदाची शिफारस केली होती.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने 24 डिसेंबर रोजी सीडीएस पद आणि त्याच्या सनद व कर्तव्यास मान्यता दिली आहे.
- सीडीएस किंवा ट्राय सर्व्हिसेस प्रमुख वयाच्या 65 वर्षापर्यंत सेवा देण्यास सक्षम असतात. पूर्वीच्या नियमानुसार या तिन्ही सेवांचे प्रमुख वयाच्या 62 व्या वर्षापर्यंत किंवा पदग्रहणानंतर तीन वर्षांपर्यंत सेवेत राहण्यास पात्र आहेत.
- सीडीएस पदावरील व्यक्ती थेट पंतप्रधान कार्यालयाला उत्तर देण्यास बांधील असेल. तसेच या पदावरील व्यक्तीचा मान देखील सर्वाधिक असेल.
- युद्धाच्या काळात लष्कराच्या तिन्ही दलांमध्ये समन्वय साधण्याचं काम आणि 'सिंगल विंडो' सल्ला घेण्यास ही व्यक्ती बांधिल असेल.
दरम्यान बिपीन रावत यांच्या निवृत्तीनंतर भारताचे नवे लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे या मराठमोळ्या अधिकार्याची नियुक्ती झाली आहे. भारत देशाचे लष्कर जगातील तिसरे सर्वात मोठे लष्कर, चौथ्या क्रमांकाचे हवाई दल आणि पाचव्या क्रमांकाचे नौदल असल्याचे मानले जाते.