Antibiotic Choona: एंटीबायोटिक औषधांच्या नावाखाली चून्याच्या गोळ्यांची विक्री; गुजरातमध्ये 17.5 लाख लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

त्यांच्याकडून काही बनावट औषधेही जप्त करण्यात आली आहेत. ज्यांची बाजारातील किंमत सुमारे 17.5 लाख रुपये आहे.

Medicines प्रतिकात्मक प्रतिमा (Photo Credits-File Image)

एंटीबायोटीक (Antibiotics Medicines) औषधांच्या नावाखाली केवळ चुना विकला जात असल्याचा धक्कादायक प्रकार गुजरात राज्यातील गांधीनगर येथून पुढे येत आहे. बोगस औषधांच्या नावाखाली ग्राहकांना आणि रुग्णांच्या आरोग्याला 'चुना' लावला जात असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर एफडीसीए द्वारा केलेल्या कारवाईत या धक्कादायक घटनेचा भांडाफोड झाला. एफडीसीएने माहिती देताना सांगण्यात आले की, या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून काही बनावट औषधेही जप्त करण्यात आली आहेत. ज्यांची बाजारातील किंमत सुमारे 17.5 लाख रुपये आहे. प्राथमिक तपासात पुढे आले आहे की, आरोपींनी हिमाचल प्रदेशातील एका कंपनीची निर्मिती असलेली ही औषधे कॅल्शियम कार्बोनेट म्हणजेच चुन्यापासून बनवलेल्या गोळ्या होत्या. ज्या आकर्षक वेष्टनात गुंडाळून विकल्या जात होत्या.

गुजरात एफडीसीएचे आयुयक्त एचजी कोशिया यांनी सांगितले की, आम्ही एंटीबायोटीक औषधे म्हणून विकल्या जाणाऱ्या या गोळ्यांचे परिक्षण प्रयोगशाळेमध्ये केल. अहवाल पाहून आम्हाला धक्का बसला. कारण, आरोपींनी या औषधांच्या नावाखाली कॅल्शियम कार्बोनेट म्हणजेच चुन्यापासून तयार करण्यात आलेल्या गोळ्या होत्या. आम्ही तातडीने या गोळ्या जप्त केल्या आणि पुढील अहवालासाठी पाठवून दिल्या. अशा प्रकारची औषधे निर्मिती करण्याच्या प्रकारात एक रॅकेट गुंतल्याचा संशय आहे. आम्ही त्याचा शोध घेत आहोत.

एफडीसीएने एका निवेदनात म्हटले की, काही आरोपी निनावी कंपनीच्या मेडीकल किप्रेजेंटेटीव्हच्या रुपात काम करत होते. वेगवेगळ्या क्लिनिकल भेट देऊन ते डॉक्टरांपर्यंत पोहोचत होते. विभागाने सांगितले की, आम्ही छापेमारी करुन नडियाद, सूरत, अहमदबाद आणि राजकोट येथे कारवाई करण्यात आली. गंभीर आजारामध्ये वापरली जाणारी औषधे हे आरोपी नकली रित्या बनवत होते. ही नकली औषधे ते एंटीबायोटीक म्हणून डॉक्टर आणि मेडिकल्सला विकत होते. ज्यामुळे आगोदरच गंभीर आजाराचा सामना करत असलेल्या रुग्णांना अधिकच गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत होते.

एफडीसीएच्या अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, प्राप्त माहितीवरुन आम्ही एक गुप्त मोहीम राबवली. ज्यामध्ये आम्ही खीमाराम कुम्हार नावाच्या व्यक्तीकडून POSMOX CV 625 चे 99 बॉक्स पकडण्यात आले. धक्कादायक म्हणजे या गोळ्यांची किंमत 2,61,250 रुपये इतकी होती. जेव्हा त्याच्याकडे चौकशी केली तेव्हा त्याने सांगितले की, अशाच प्रकारचा माल त्याने अहमदाबाद येथील अरुण आमेरा याच्याकडेही पाठवला आहे. ज्याची ओळख विपूल देगडा अशी झाली. अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली असून यामागे मोठे रॅकेट आहे का याचाही शोध घेतला जात आहे.