Aparajita Woman and Child Bill: पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जी यांनी सादर केलं बलात्कार विरोधी विधेयक; दोषीला 10 दिवसात फाशी ची तरतूद
बंगालच्या विधिमंडळामध्ये आज सरकार सोबतच विरोधक भाजपाने देखील अपराजिता कायद्याला मंजुरी दिली आहे. आता हा कायदा राज्यपालांकडे पारित करण्यासाठी पाठवण्यात आला आहे.
Anti-Rape Bill in WB: कोलकाता मध्ये आर जी कर मेडिकल हॉस्पिटल (R G Kar Hospital) मध्ये प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करून हत्या झाल्याच्या घटनेचे देशभर पडसाद उमटले आहेत. या घटनेविरोधात डॉक्टरांकडून आंदोलन सुरू असताना आज टीएमसी ने विधिमंडळामध्ये बलात्कार विरोधी विधेयक मांडले आहे. हा 'अपराजिता कायदा' आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या कायद्याला ऐतिहासिक म्हटलं आहे. नक्की वाचा: West Bengal: पश्चिम बंगालमध्ये आणखी एका तरूणीवर बलात्कार आणि हत्येच्या अफवांना उधाण; पोलिसांकडून कडक कारवाईचा इशारा .
अपराजिता कायदा काय आहे?
ममता बॅनर्जींचा हा अपराजिता कायदा बलात्कार विरोधी कायदा आहे. यामध्ये दोषींवर दहा दिवसात कारवाई होणार आहे. दोषीला फाशी ची तरतूद आहे. त्याबरोबरच प्राथमिक तपासणी अहवाल 21 दिवसांमध्ये सादर करावा लागणार आहे. जिल्हा पातळीवर टास्क फोर्स स्थान करण्याची आणि वेळेत सुनावणी पूर्ण करण्याची तरतूद आहे.
बंगालच्या विधिमंडळामध्ये आज सरकार सोबतच विरोधक भाजपाने देखील अपराजिता कायद्याला मंजुरी दिली आहे. आता हा कायदा राज्यपालांकडे पारित करण्यासाठी पाठवण्यात आला आहे. नक्की वाचा: Shakti Bill: 'शक्ती कायदा' मंजूरीसाठी सुप्रिया सुळे सह NCP-SCP कार्यकर्त्यांचं आज मुंबई मध्ये आंदोलन .
3 सप्टेंबर म्हणजे आजच्याच दिवशी 1981 रोजी संयुक्त राष्ट्र संघाने महिलांवरील अत्याचाराविरुद्ध कारवाई केली आणि महिलांविरुद्ध भेदभाव विषयक अधिवेशन सुरू केले. मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी, या ऐतिहासिक तारखेला हे विधेयक स्वीकारण्यासाठी मी सर्वांचे आभार मानते असेही म्हटले. तसेच अशा गंभीर गुन्ह्यांना बळी पडलेल्या आणि मरण पावलेल्या पीडितेबद्दल मी शोक व्यक्त केला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)