Animal Abuse Viral Video: अमानुष अत्याचारामुळे कुत्रा जखमी; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
अशीच एक सुन्न करणारी घटना पुढे आली आहे. ही घटना राजस्थान (Rajasthan) राज्यातील जोधपूर (Jodhpur) शहरातील असल्याचे समजते. या घटनेत कुत्र्याचा (Dog ) अमानूष छळ करण्यात आला आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
प्राणी अत्याचाराच्या घटनांनी (Animal Abuse Viral Video) मन अनेकदा सुन्न होऊन जाते. अशीच एक सुन्न करणारी घटना पुढे आली आहे. ही घटना राजस्थान (Rajasthan) राज्यातील जोधपूर (Jodhpur) शहरातील असल्याचे समजते. या घटनेत कुत्र्याचा (Dog ) अमानूष छळ करण्यात आला आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. लेटेस्टली मराठी या घटनेची पुष्टी करत नाही. आम्ही आपणास सांगू इच्छितो की हा व्हिडिओ आपल्या मनाला धक्का पोहोचवू शकतो.
व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक कार रस्त्यावरुन धावत आहे. त्या कारच्या मागे कुत्रा धावत आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिल्यावर लक्षात येते की कुत्रा कारच्या मागे धावत नाही. तर, त्याच्या गळ्यात साखळी बांधली आहे. ही साखळी कारमध्ये बसलेल्या व्यक्तीच्या हातात आहे. ज्यामुळे कुत्रा कारच्या मागे धावण्याचा प्रयत्न करतो आहे. तो धावण्यापेक्षा अधिक खेचलाच जात आहे. कारच्या वेगासोबत आपला वेग जुळवताना त्याची कुतरओढ होत आहे. दावा केला जात आहे की, कारच्या वेगासोबत धावू न शकल्याने कुत्रा रस्त्यावर फरफटला जातो आहे. त्यामुळे त्याला अनेक ठिकाणी जखमाही झाल्या आहेत. (हेही वाचा, Delhi Shocker: पाळीव कुत्रा भुंकल्याने तरुणाला आला राग, संतापलेल्या व्यक्तीने शेजारच्यांना केली मारहाण, पहा व्हिडीओ)
ट्विट
सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, कुत्र्याला कारमागे फरफटत नेणारा व्यक्ती हा रजनीश ग्वाला आहे आणि तो पेशाने डॉक्टर आहे. डॉग होम फाउंडेशन नावाच्या सोशल मीडिया अकाउंटने केलेल्या ट्विटनुसार, या घटनेनंतर कुत्र्याला अनेक फ्रॅक्चर झाले आहेत. व्हिडीओमध्ये एक कार रस्त्यावरुन जाताना दिसत आहे. त्या कारमागे कुत्र्याला पट्ट्याने ओढले जात आहे. हा कुत्रा जीवाच्या कराराने कारमागे धावताना दिसत आहे.