अनिल अंबानी यांनी टेलिकॉम स्पेक्ट्रमची रक्कम तिसऱ्यांदा थकवली
अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सने (Reliance Communications) टेलिकॉम स्पेक्ट्रमची रक्कम पुन्हा एकदा चुकवली आहे.
जगप्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सने (Rcom) टेलिकॉम स्पेक्ट्रमची रक्कम पुन्हा एकदा चुकवली आहे. त्यामुळे आता तिसऱ्यांदा टेलिकॉम स्पेक्ट्रमची (Telecom Spectrum) रक्कम थकवली आहे. याबद्दल एका सरकारी अधिकाऱ्याने अधिक माहिती दिली आहे.
कर्जामध्ये बुडत असलेल्या रिलायन्स कम्युनिकेशन्स स्वत:ला दिवाळखोर घोषित होण्यापासून वाचवण्यासाठी दावा लॉ अॅपिलेट ट्रिब्युनलकडे करणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे टेलिकॉमला 492 कोटी रुपये देणार नाही असा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.मात्र 30 एप्रिल रोजी लॉ अॅपिलेट ट्रिब्युनल सुनावणी करणार आहेत.(अनिल अंबानी यांची Rcom दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, अंबानी समूह कंपन्यांमध्ये खळबळ, 54 टक्क्यांनी घसरला आरकॉमचा शेअर)
13 मार्च पर्यंत कंपनीला 21 कोटी रुपये स्पेक्ट्रमसाठी देणे लागत होते. परंतु ही रक्कम कंपनीने भरली नसल्याने ती आता 281 कोटी रुपये झाली आहे. तर टेलिकॉम मंत्रालयाने कंपनीला 5 एप्रिलची मुदत सुद्धा देऊ केली होती. मात्र दुसऱ्यांदा आणि तिसऱ्या वेळेसही रिलायन्स कंपनीने दिलेली मुदत चुकवली आहे.