Kaimur Shocker: विद्यार्थ्यांकडून शिक्षकांना बेदम मारहाण, गुन्हा दाखल, घटनेचा व्हिडिओ व्हायरल (Watch Video)

कैमुर जिल्ह्यातील भगवानपूर येथे ब्लॉकच्या सरैया येथील उच्च माध्यमिक शाळेत एक धक्कादायक घटना घडली आहे. चार ते पाच मुलांच्या गटाने शाळेत घुसून शाळेतील कर्मचाऱ्यांना मारहाण केली.

Kaimur Shocker: विद्यार्थ्यांकडून शिक्षकांना बेदम मारहाण, गुन्हा दाखल, घटनेचा व्हिडिओ व्हायरल (Watch Video)
Bihar Students Beat Teacher PC X

Kaimur Shocker: बिहारच्या कैमुर जिल्ह्यातील भगवानपूर येथे ब्लॉकच्या सरैया येथील उच्च माध्यमिक शाळेत एक धक्कादायक घटना घडली आहे. चार ते पाच मुलांच्या गटाने शाळेत घुसून शाळेतील कर्मचाऱ्यांना मारहाण केली. वर्गात शिकवत असलेल्या शिक्षकांना देखील मारहाण केली. शाळेच्या मालमत्तेचे भरपूर नुकसान केले. या प्रकरणी पोलिसांनी पाच ते सात जणांवर एफआयआर नोंदवला आहे. (हेही वाचा- बोलणं बंद केल्यामुळे मैत्रिणीवर चाकू हल्ला, आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न)

मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक निकालावर टीका केली होती आणि वर्गात मस्ती केल्या बद्दल ओरडले होते. याच गोष्टीचा राग मनात धरत काही विद्यार्थ्यांनी शिक्षकांना मारायचे ठरवले. संतापलेल्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या शिक्षकांवर हल्ला केला. वर्गातील खुर्च्यांची तोडफोड केली. शिक्षकांना बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. भगवानपूर पोलिस ठाण्यातील पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून घेतला.

मारहाणीचा व्हिडिओ 

अज्ञात आरोपींवर एफआयआर नोंदवला गेला. या प्रकरणी तक्रारदार शिक्षकांनी सांगितले की, तीन शिक्षक गंभीर जखमी झाले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यावेळीस मुख्यध्यापक उपस्थित नव्हते. घटनेची माहिती मिळताच, ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. ही घटना १० सप्टेंबर रोजी घडली आहे. जिल्हाधिकारी अक्षय पांडे यांना घटनेची माहिती देण्यात आली. या घटनेसंदर्भात पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर अनेकांनी संताप व्यक्त केला.

(The above story first appeared on LatestLY on Sep 13, 2024 03:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).