Vande Bharat Express: विशाखापट्टणम येथे 'वंदे भारत एक्सप्रेस' ट्रेनवर पुन्हा दगडफेक
ही घटना आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) विशाखापट्टणम येथे घडली. या घटनेसंदर्भात काढण्यात आलेल्या एका पत्रकात म्हटले आहे की, पाठिमागील तीन महिन्यांमध्ये विशाखापट्टणम-सिकंदराबाद (Vishakhapatnam-Secunderabad ) 'वंदे भारत एक्सप्रेस' ट्रेनवर दगडफेक होण्याची ही तिसरी घटना आहे.
'वंदे भारत एक्सप्रेस' ( Vande Bharat Express) ट्रेनवर दगफेकीची घटना पुन्हा एकदा घडल्याचे पुढे आले आहे. ही घटना आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) विशाखापट्टणम (Visakhapatnam ) येथे घडली. या घटनेसंदर्भात काढण्यात आलेल्या एका पत्रकात म्हटले आहे की, पाठिमागील तीन महिन्यांमध्ये विशाखापट्टणम-सिकंदराबाद (Vishakhapatnam-Secunderabad ) 'वंदे भारत एक्सप्रेस' ट्रेनवर दगडफेक होण्याची ही तिसरी घटना आहे. विशाखापट्टणमहून बुधवारी (5 एप्रिल) निघणारी वंदेभारत एक्स्प्रेस पूर्वनियोजीत वेळेनुसार न सोडता काहीशी विलंबाने सोडण्यात आली. प्रशासनाने सांगितले की, वंदेभारत एक्स्प्रेस 05:45 वाजता सुटण्याऐवजी 09:45 वाजता सोडण्यात आली कारण C-8 कोचच्या खिडकीची काच दगडफेकीमुळे फुटली. ती काच पूर्ववत करण्यास आवश्यक कालावधी पूर्ण झाल्यानंतरच एक्सप्रेस पुढी प्रवासाला निघाली.
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम शहरात वंदे भारत ट्रेनवर या आधी जानेवारी (2023) महिन्यात देखभालीदरम्यान दगडफेक करण्यात आली होती.ही दगडफेक विशाखापट्टणममधील कांचरापलेमजवळ झाली. ज्यामुळे वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्याच्या काचेचे नुकसान झाले.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) अनुप कुमार सेतुपती यांनी दिलेल्या माहितीनुसार, "वंदे भारत ट्रेन विशाखापट्टणम येथे देखभाल आणि दुरुस्तीसाठी पोहोचली असताना काही अज्ञात व्यक्तींनी त्यावर दगडफेक केली. ट्रेनच्या डब्यांवर दगडफेक करण्यात आली. (हेही वाचा, Mumbai-Solapur Vande Bharat Express: आता मुंबई-सोलापूर मार्गावर धावणार वंदे भारत एक्सप्रेस; देवेंद्र फडणवीस यांची माहिती)
अनुप कुमार सेतुपती यांनी सांगितले की, कांचरापलेमजवळ काही अज्ञात व्यक्तींनी कोचवर दगडफेक केल्याने नवीन वंदे भारत ट्रेनच्या कोचची काच फुटली. आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे पडताळत आहोत. आमचे आरपीएफ पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. त्यांना एकदा पकडले की पुढील कारवाई होईल. रेल्वे ही जनतेच्या पैशाची आहे. मी अशा लोकांना आवाहन करतो जे असे प्रकार करू नका. खिडकीच्या काचेची किंमत अंदाजे एक लाख आहे, असेही डीआरएम अनुप कुमार सेतुपती यांनी पुढे म्हटले.