Andhra Pradesh Shocker: आंध्र प्रदेशमध्ये लग्नाच्या एका महिन्यानंतर आढळला तरुणाचा मृतदेह; कुटुंबाने केला 'पत्नीचे विवाहबाह्य' संबंध असल्याचा आरोप

तेजश्वर हा मूळचा तेलंगणातील रहिवासी आहे. मे 2025 मध्ये कर्नूल येथील ईश्वर्याशी त्याचा विवाह झाला होता. हा विवाह तेजश्वरच्या इच्छेनुसार प्रेमविवाह होता, परंतु त्याच्या कुटुंबाने या विवाहाला विरोध दर्शवला होता. कुटुंबीयांच्या मते, ईश्वर्याची आई एका बँकेत काम करते आणि ईश्वर्याचे त्या बँकेतील एका कर्मचाऱ्याशी संबंध होते.

Indian Wedding (Photo credits: Pixabay)

राजा रघुवंशी याची हनिमूनवेळी झालेल्या भयानक हत्येच्या (Raja Raghuvanshi Murder Case) काही आठवड्यांनंतर, आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) कुरनूल येथेही अशीच घटना समोर आली आहे. येथे लग्नाच्या एक महिन्यानंतर तेजश्वर नावाच्या पुरूषाचा मृतदेह आढळला आहे. या प्रकरणी त्याची नवविवाहित पत्नी आणि तिच्या आईला ताब्यात घेण्यात आले आहे. अहवालानुसार, या जोडप्याचे 18 मे रोजी लग्न झाले होते. त्यानंतर एका महिन्यानी 17 जून रोजी, 32 वर्षीय तेजेश्वर बेपत्ता झाला होता. आता त्याचा मृतदेह कालव्यात सापडला आहे. तो खाजगी जमीन सर्वेक्षण करणारा आणि नृत्य शिक्षक म्हणून काम करत होता.

तेजश्वरच्या कुटुंबाने त्याची पत्नी ईश्वर्या हिचे विवाहबाह्य संबंध असून, तिच्यावर त्याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी ईश्वर्या आणि तिची आई सुजाता यांना ताब्यात घेतले आहे आणि त्यांची चौकशी सुरू आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माध्यमांना सांगितले की चौकशी सुरू आहे, परंतु दोघींनी तेजेश्वरच्या कुटुंबाचे आरोप फेटाळून लावले आहेत.

तेजश्वर हा मूळचा तेलंगणातील रहिवासी आहे. मे 2025 मध्ये कर्नूल येथील ईश्वर्याशी त्याचा विवाह झाला होता. हा विवाह तेजश्वरच्या इच्छेनुसार प्रेमविवाह होता, परंतु त्याच्या कुटुंबाने या विवाहाला विरोध दर्शवला होता. कुटुंबीयांच्या मते, ईश्वर्याची आई एका बँकेत काम करते आणि ईश्वर्याचे त्या बँकेतील एका कर्मचाऱ्याशी संबंध होते. याबाबत त्यांनी तेजश्वरला सावध केले होते. मात्र, त्याने कुटुंबाच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून विवाह केला. पुढे 17 जून 2025 रोजी तो बेपत्ता झाला, आणि त्याच्या कुटुंबाने 18 जून रोजी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. (हेही वाचा: Jharkhand Spousal Murder: लग्नाच्या 36 व्या दिवशी पतीची हत्या, नववधूचा प्रताप; विषप्रयोग करुन उधळले गुण)

नंतर 22 जून 2025 रोजी पोलिसांना पिनापुरमजवळ गालेरू नगरी कालव्यात एक मृतदेह आढळला, जो नंतर तेजश्वरचा असल्याचे समजले. तेजश्वरच्या कुटुंबाने ईश्वर्या आणि तिची आई यांच्यावर थेट हत्येचा आरोप केला आहे. त्यांच्या मते, ईश्वर्याचे बँकेतील कर्मचाऱ्याशी असलेले संबंध विवाहानंतरही सुरू होते, आणि तेजश्वरला याची जाणीव झाली होती. कुटुंबियांचा दावा आहे की, ईश्वर्या आणि तिच्या प्रियकराने तेजश्वरला मारण्याचा कट रचला. आता याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘आम्ही चौकशी करत आहोत मात्र सध्या कोणताही निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल.’

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement