Andhra Pradesh Local Body Poll Results: आंध्र प्रदेशमध्ये YSR प्रमुख जगन रेड्डी यांच्या लाटेत BJP सपाट; ZPTC निवडणुकीत शून्य जागा
आंध्र प्रदेश (Andhra Pradesh राज्यात अनेक प्रयत्न करुनही भारतीय जनता पक्ष हवा तसा पाय रोवू शकली नाही. आता तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत YSR Congress प्रमुख जगन रेड्डी यांच्या लाटेसमोर BJP सपाट झाला आहे.
आंध्र प्रदेश (Andhra Pradesh राज्यात अनेक प्रयत्न करुनही भारतीय जनता पक्ष हवा तसा पाय रोवू शकली नाही. आता तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत YSR Congress प्रमुख जगन रेड्डी (Jagan Reddy) यांच्या लाटेसमोर BJP सपाट झाला आहे. आंध्र प्रदेशमध्ये जिल्हा परिषद क्षेत्रीय मतदारसंघ (ZPTC) निवडणुकीत ( ZPTC Elections Andhra Pradesh) जगन रेड्डी यांच्या YSR काँग्रेसने जिल्हा परिषद निवडणुकीत जवळपास 90% जागा मिळवल्या आहेत. तर भाजप आणि त्यांचा सहकारी पक्ष जन सेना यांना या निवडणुकीत खातेही उघडता आले नाही. हे दोन्ही पक्ष एकही जागा मिळवू शकले नाहीत.
ZPTCs निवडणुकीत 515 आणि MPTCs निवडणुकीसाठी 7,220 जागांसाठी 8 एप्रिल रोजी निवडणूक सुरु झाली. या निवडणुकीचे निकाल 10 एप्रिल रोजी घोषीत होणार होते. मात्र, आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात तेलुगु देशम पार्टी आणि भाजप द्वारा याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामुळे काही काळ मतमोजणी रोखण्यात आली होती. विरोधी पक्षाने आरोप केला होता की, या निवडणुकीत आदर्श आचार संहितेचे उल्लंघन झाले आहे. मात्र अखेर हायकोर्टाच्या खंडपीठाने मतदमोजणीस मान्यता दिली. (हेही वाचा, Gujarat CM Bhupendra Patel Cabinet: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळात विजय रुपाणी सरकारमधील मंत्र्यांना डच्चू; 8 पटेल, 6 OBC यांच्यासह 24 मंत्र्यांनी घेतली शपथ)
रविवारी आलेल्या मतमोजणी निकालात वायएसआरह काँग्रेसने एकूण 553 पैकी 547 ZPTC जागा जिंकल्या. MPTC निकाल तर आणखीच आश्चर्यचकित करणारे ठरले. वाईएसआर कांग्रेस ने 8083 जागांपैकी 7284 जागा जिंकल्या. भाजप आणि त्यांचा सहकारी पक्ष सहयोगी जन सेना जिल्हा परिषद निवडणुकीत एकही जागा मिळवू शकला नाही. दोन्ही निवडणुकात पक्षाने अनुक्रमे 23 आणि 85 जागा जिंकल्या आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)