Child Marriage: बालविवाह रोखल्याने तिच्या आयुष्यात नवा प्रकाश; केंद्रीय शिक्षण मंत्रालयानेही घेतली दखल; वाचा सविस्तर

ते वेळीच रोखले तर अनेक मुलींच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण होऊ शकतो. आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) राज्यातील कुरनूल येथी एका मुलीने ते दाखवून दिले आहे.

G Nirmala | (Photo Credit - X)

बालविवाह (Child Marriage) झाल्याने अनेक मुलींचे भविष्य धोक्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. ते वेळीच रोखले तर अनेक मुलींच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण होऊ शकतो. आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) राज्यातील कुरनूल येथी एका मुलीने ते दाखवून दिले आहे. सदर मुलीचा बालविवाह करण्याचा घाट तिच्या कुटुंबीयांनी घातला. मात्र, समाजातील काही पुरोगामी मंडळींनी तो हाणून पाडला. परिणामी या मुलीचे शिक्षण पुढे कायम राहिले. जी. निर्मला (G Nirmala) असे या मुलीचे नाव आहे. उल्लेखनीय असे की, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय (KGBV), कुर्नूल या वंचित घटकांसाठी शिक्षण मंत्रालयातर्फे चालवल्या जाणाऱ्या निवासी मुलींच्या शाळेत निर्मलाही इंटरमिजिएट परीक्षेत (Andhra Pradesh's Intermediate Exam) अव्वल ठरली आहे. परीक्षे तिने 440 पैकी 421 गुण मिळवले आहेत. ज्यामुळे तिचे परिसरात कौतुक होत आहे.

केंद्री शिक्षण मंत्रालयाकडून दखल

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने त्याच्य अधिकृत X हँडलवर लिहीलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय (KGBV), कुरनूल, भारतातील वंचित घटकांसाठी शिक्षण मंत्रालयाद्वारे चालवल्या जाणाऱ्या निवासी मुलींची शाळा, आंध्रच्या 1ल्या वर्षाच्या इंटरमिजिएट परीक्षेत अव्वल स्थान मिळवल्याबद्दल जी. निर्मला हिचे अभिनंदन. बालविवाह रोखल्यानंतर आलेल्या विविध आव्हानांवर मात करूनही तिने 440 पैकी 421 गुण मिळवले. तिची IPS अधिकारी बनण्याची आकांक्षा सामाजिक न्यायाप्रती तिचे समर्पण दर्शवते. तिचा आनंद साजरा करूया आणि तिच्या भविष्यातील कामांसाठी तिला शुभेच्छा!, प्रदेश इंटरमीडिएट बोर्ड". (हेही वाचा, Pakistan Child Marriage: पाकिस्तानात बालविवाहावरून खळबळ! 13 वर्षाच्या मुलाचा 12 वर्षाच्या मुलीची विवाह, व्हिडिओ व्हायरल (Watch))

आमदार वाय साईप्रसाद रेड्डी यांच्याकडून कौतुक

दरम्यान, वायएसआरसीपी पक्षचे आमदार आमदार वाय साईप्रसाद रेड्डी यांनीही जी. निर्मला हिच्या यशाची दखल घेत कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, निर्मला ही सुरुवातीपासूनच आपल्या शैक्षणीक उद्दीष्ट आणि स्वप्नांचा पाठपुरावा करण्यावर ठाम होती. तिचा ठाम निश्चय तिला यशापर्यंत घेऊन गेला. तिचा बालविवाह करण्यात येणार होता. मात्र, समाजातील सजग लोकांनी तो तडीस जाऊ दिला नाही. परिणामी तिच्या स्वप्नांना बळ मिळाले. (हेही वाचा, Rajasthan: सात वर्षाच्या मुलीची 38 वर्षांच्या व्यक्तीसोबत लग्नासाठी 4.5 लाख रुपयांन विक्री, राजस्थान राज्यातील घटना)

एक्स पोस्ट

सांगितले जात आहे की, आमदार वाय साईप्रसाद रेड्डी यांना जी. निर्मला हिचा बालविवाह होत असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच त्यांनी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केला आणि होऊ घातलेला बालविवाह रोखला गेला. जिल्हा प्रशासनाने जी. निर्मला हिची दखल घेत तिला तिला अस्पारी येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात दाखल केले. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासन आणि समाजातील पुरोगामी लोक यांनी दाखविलेल्या विश्वासाला तडा न जाऊ देता तिने उत्कृष्ट कामगिरी केली.