Operation Sindoor: प्रयागराजच्या अनामिका शर्माने थायलंडमध्ये रचला इतिहास! 12 हजार फूट उंचीवर फडकावला 'ऑपरेशन सिंदूर'चा झेंडा, पहा व्हिडिओ

अनामिकाने 12000 फूट उंचीवर 'ऑपरेशन सिंदूर'चा झेंडा फडकवला आहे. थायलंडमधील बँकॉकमध्ये अनामिका 12 हजार फूट उंचीवरून आकाशातून उडी मारली. यावेळी तिच्या हातात 'ऑपरेशन सिंदूर'चा झेंडा होता.

Operation Sindoor: प्रयागराजच्या अनामिका शर्माने थायलंडमध्ये रचला इतिहास! 12 हजार फूट उंचीवर फडकावला 'ऑपरेशन सिंदूर'चा झेंडा, पहा व्हिडिओ
Skydiver Anamika Sharma Video (फोटो सौजन्य - फेसबुक)

Skydiver Anamika Sharma Video: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील रहिवासी आणि देशातील सर्वात तरुण स्काय डायव्हर अनामिका शर्मा (Anamika Sharma) ने पुन्हा एकदा परदेशात भारताची मान उंचावली आहे. ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) च्या यशानंतर तिने भारतीय सैन्याला अनोख्या पद्धतीने सलाम केला आहे. अनामिकाने 12000 फूट उंचीवर 'ऑपरेशन सिंदूर'चा झेंडा फडकवला आहे. थायलंडमधील बँकॉकमध्ये अनामिका 12 हजार फूट उंचीवरून आकाशातून उडी मारली. यावेळी तिच्या हातात 'ऑपरेशन सिंदूर'चा झेंडा होता.

अनोख्या पद्धतीने केला भारतील लष्कराला सलाम -

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू केले. ऑपरेशन सिंदूरला आता एक महिना झाला आहे. भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले होते. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर देशभरात तिरंगा शौर्य यात्रा काढण्यात आल्या. आता अनामिका शर्मानेही तिच्या अनोख्या शैलीत भारतीय सैन्याला सलाम केला आहे.

अनामिका शर्माचा व्हिडिओ व्हायरल -

भारतीय वेळेनुसार गुरुवारी सकाळी 11 वाजता अनामिकाने हवेत उडी घेत ऑपरेशन सिंदूरचा झेंडा फडकावला. या ऐतिहासिक स्काय डायव्हचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अनामिका ऑपरेशन सिंदूरचा लोगो असलेला झेंडा अभिमानाने फडकवत आकाशात डायव्हिंग करताना दिसत आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 07, 2025 04:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).