Tirupati Laddus Row: तिरुपती लाडूच्या वादाशी संबध जोडल्यामुळे अमूलने X वापरकर्त्यांविरुद्ध दाखल केली तक्रार

याला उत्तर म्हणून अमूलने अहमदाबाद सायबर क्राइम ब्रँचकडे तक्रार दाखल केली.

तिरुपती मंदिरातील लाडूंमध्ये (Tirupati temple's laddoos) वापरण्यात आलेले तूप कंपनीने पुरवल्याचा दावा करणाऱ्या खोट्या अहवालानंतर अमूलने अहमदाबादमधील सायबर क्राइम पोलिस ठाण्यात (Cyber Crime Police Station in Ahmedabad) तक्रार दाखल केली आहे. अमूलची प्रतिष्ठा खराब करण्यासाठी चुकीची माहिती पसरवण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. प्रसिद्ध मंदिरात प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी असल्यच्या आरोपवरुन सध्या राजकारण तापले आहे.   (हेही वाचा -  Tirupati Laddus Row: अयोध्येच्या राम मंदिरातही वाटण्यात आले होते तिरुपती येथील 300 किलो लाडू; मुख्य पुजाऱ्यांचा दावा )

अमूलची बदनामी करण्याच्या उद्देशाने काही व्यक्तींनी सोशल मीडियावर दिशाभूल करणारी माहिती पोस्ट केल्याचे तक्रारीत म्हटले आहे, प्रसादममध्ये वापरलेले तूप कंपनीने पुरवले होते असा खोटा दावा करून. याला उत्तर म्हणून अमूलने अहमदाबाद सायबर क्राइम ब्रँचकडे तक्रार दाखल केली.

गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचे (GCMMF) व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांनी या समस्येवर लक्ष वेधले, ते म्हणाले, “तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये वापरण्यात येणारे तूप भेसळयुक्त असल्याचा आरोप करणाऱ्या पोस्ट अनेक दिवसांपासून फिरत आहेत, काही जणांनी असा दावा केला आहे की, तूप पुरवठा केलेल्या लाडूंमध्ये भेसळ आहे. मला हे स्पष्ट करायचे आहे की अमूलने तिरुपती देवस्थानमला तूप पुरवले नाही, ज्यांनी अमूलला या वादात ओढण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यामुळेच आम्ही अहमदाबाद सायबर क्राइममध्ये एफआयआर दाखल केला आहे.

"अमूलची मालकी 3.6 दशलक्ष शेतकरी कुटुंबांकडे आहे. या खोट्या प्रचाराचा आणि चुकीच्या माहितीचा त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होऊ शकतो, त्यामुळेच ही चुकीची माहिती पसरवण्यापासून रोखण्यासाठी आम्ही कायदेशीर कारवाई केली आहे. वाद निर्माण झाल्यापासून, आम्ही आमच्या सोशल मीडियाचाही वापर केला आहे. अमूलने तिरुपती देवस्थानमला कधीही तूप पुरवठा केला नाही हे प्लॅटफॉर्म सर्व मानकांना उत्तीर्ण करणारी आहेत आणि आम्ही वर्षानुवर्षे प्रीमियम तूप ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहोत," मेहता पुढे म्हणाले.