हरियाणा: Coronavirus Lockdown मध्ये जिल्हा कलेक्टरने रात्री 8 वाजता ऑफिस उघडून लावले रोहतकच्या नवरदेवाचं मॅक्सिकन मुलीशी लग्न !
जिल्हा कलेक्टरने चक्क रात्री 8 वाजता आपलं ऑफिस उघडून दोघ जीवांची लगीनगाठ बांधल्याचं वृत्त समोर आलं आहे.
भारतामध्ये कोरोना व्हायरस लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्यात आल्याने आता नागरिकांवरील संचारबंदीचे नियम अधिक कडक झाले आहेत. त्यामुळे घरात अडकून पडलेल्या अनेकांचं जनजीवन स्तब्ध झालं आहे. अशातच या काळात लग्नाच्या बंधनात अडकणार्या अनेकांना त्यांची लग्नं पुढे ढकलावी लागली आहेत. मात्र अशा परिस्थितीमध्येही हरियाणा मधील रोहतक मध्ये चक्क एक लग्न पार पडलं. जिल्हा कलेक्टरने चक्क रात्री 8 वाजता आपलं ऑफिस उघडून दोघ जीवांची लगीनगाठ बांधल्याचं वृत्त समोर आलं आहे. दरम्यान देशात लॉकडाऊन असल्याने हरियाणाचा नवरदेव आणि मॅक्सिकोची वधू यांचा विवाहसोहळा मागील काही दिवसांपासून अडकून पडला होता.
रोहतक येथील सूर्या कॉलनीमध्ये राहणारे निरंजन कश्यप यांनी डेप्युटी कमिशनर आर. एस. वर्मा यांच्या कार्यालयात लग्नाचा अर्ज दाखल केला होता. या अर्जाचा स्वीकार करत वर्मा यांनी रात्री 8 वाजता ऑफिस उघडून विवाहसोहळा पार पाडला. या प्रसंगी मुलीची आई आणि मुलाचे वडील उपस्थित होते. Coronavirus Lockdown मुळे औरंगाबाद येथे मुस्लिम कपलने व्हिडिओ कॉलवरच उरकला 'निकाह' (Watch Video).
ANI Tweet
दरम्यान निरंजन कश्यप याने 17 फेब्रुवारीला स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत लग्नासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र अचानक लॉकडाऊन जाहीर झाल्याने सारंचं बाळगळलं. मात्र त्यांनी जिल्हा कलेक्टरकडे अर्ज दाखल करून परवानगी मागितली. वधू ही मूळची मॅक्सिकन असुन तिचं नावं डॅना आहे. डॅना आपल्या आईसोबत 11फेब्रुवारीला भारतामध्ये आली. दरम्यान डॅना आणि निरंजनची ओळख एका लर्निंग अॅपवर झाली.