Amarnath Yatra 2022: अमरनाथ यात्रेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू; इथे जाणून घ्या या यात्रेच्या रजिस्ट्रेशनची प्रक्रिया, तारीख, वेळ!
2019 साली ऑगस्ट महिन्यात Article 370 हटवल्यानंतर 43 दिवसांची अमरनाथ यात्रा मध्यावरच स्थगित करण्यात आली होती.
अमरनाथ यात्रा (Amarnath Yatra) यंदा कोविड19 (COVID 19) चं संकट थोडं निवळल्यानंतर पुन्हा सुरू होत आहे. 2 वर्षांच्या खंडानंतर यंदा पुन्हा पहिल्याप्रमाणे ही यात्रा रंगणार आहे. अमरनाथ यात्रा हिंदू धर्मियांसाठी पवित्र यात्रांपैकी एक आहे. अमरनाथ यात्रेसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू झाली असून भाविक श्राइन बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट किंवा मोबाइल अॅप्लिकेशनद्वारे नोंदणी करू शकतात. 11 एप्रिल पासून सुरू झालेली नोंदणी 30 जूनपर्यंत सुरू राहणार आहे.
दरम्यान यंदाची अमरनाथ यात्रा 30 जून ते 11ऑगस्ट मध्ये होणार आहे. या यात्रेमध्ये 13-75 वयोगटातील नागरिकांना सहभागी होता येणार आहे. 13 वर्षापेक्षा लहान आणि 75 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्यांना सहभागी होता येणार नाही.
कसं कराल रजिस्ट्रेशन
- Shri Amarnathji Shrine Board च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- What's New section मधील "Click here to register online" या पर्यायावर क्लिक करा.
- आता एक नवीन पेज ओपन होईल.
- अमरनाथ यात्रेसाठी रजिस्ट्रेशनकरिता एका डिरेक्ट लिंक वर क्लिक करा.
- यानंतर तुमची एंट्री रजिस्टर करा.
जम्मू आणि काश्मीर बँक, पीएनबी बँक, येस बँक आणि एसबीआय बँकेच्या देशभरातील 100 शाखांच्या 446 शाखांमध्येही यात्रेसाठी नोंदणी सुरू आहे.
2019 साली ऑगस्ट महिन्यात Article 370 हटवल्यानंतर 43 दिवसांची अमरनाथ यात्रा मध्यावरच स्थगित करण्यात आली होती. लाखो भाविक हिमालयातून दक्षिण काश्मीरमधील श्री अमरनाथजी तीर्थक्षेत्रात दरवर्षी हिमलिंगाच्या रूपात असलेल्या भगवान शंकराला नमस्कार करण्यासाठी जातात.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)