New Colour Code for Govt School Buildings: ओडिशातील सर्व सरकारी शाळांच्या इमारती एकाच रंगाच्या असणार; सरकारने जारी केला नवीन रंग कोड

शाळांची ओळख आणि सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी सर्व सरकारी शाळांमध्ये एकसमान रंग कोड स्वीकारला जावा, असंही सरकारने म्हटलं आहे.

New Colour Code for Govt School Buildings (फोटो सौजन्य - ANI)

New Colour Code for Govt School Buildings: ओडिशा सरकारने (Odisha Government) सर्व सरकारी शाळांच्या इमारतींसाठी (Govt School Buildings) एक नवीन मंजूर रंग कोड (New Colour Code) जाहीर केला आहे. ओडिशा शालेय शिक्षण कार्यक्रम प्राधिकरणाने (ओएसईपीए) सर्व जिल्हाधिकारी-सह-अध्यक्ष, जिल्हा एसएस यांना पत्र लिहून त्यांच्या संबंधित जिल्ह्यातील सर्व सरकारी शाळांसाठी एकसमान रंग कोड स्वीकारण्याचे निर्देश दिले आहेत. शाळांची ओळख आणि सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी सर्व सरकारी शाळांमध्ये एकसमान रंग कोड स्वीकारला जावा, असंही सरकारने म्हटलं आहे.

अधिकृत आदेशात असे म्हटले आहे की, 'बांधकाम, दुरुस्ती आणि नूतनीकरणाच्या कामांदरम्यान पीएम श्री. शाळा देखील समाविष्ट असलेल्या सर्व सरकारी शाळांमध्ये मंजूर रंग कोड स्वीकारण्यासाठी संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांना योग्य सूचना जारी करण्याची विनंती केली आहे. हा आदेश शालेय इमारतींच्या रंग कोडशी संबंधित मागील सर्व सूचनांना मागे टाकतो,' असंही आदेशात नमूद करण्यात आलं आहे. (हेही वाचा -Mumbai: आता मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी पाळावे लागतील काही नियम व अटी; सुरक्षेच्या दृष्टीने सरकारने जारी केल्या सुधारीत मार्गदर्शक सूचना)

बांधकाम आणि दुरुस्तीमध्ये नवीन रंग कोडचे पालन बंधनकारक -

आता सर्व सरकारी शाळांना बांधकाम, दुरुस्ती आणि नूतनीकरणाच्या कामांदरम्यान नव्याने मंजूर झालेल्या रंग कोडचे पालन करणे बंधनकारक असेल. प्रत्येक शाळेत हा नियम योग्यरित्या लागू करता यावा यासाठी सरकारने प्रादेशिक अधिकाऱ्यांना सूचना देण्यास सांगितले आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की, या नवीन आदेशामुळे शाळेच्या इमारतींच्या रंगाशी संबंधित सर्व जुन्या सूचना रद्द होतील. आता सर्व शाळांमध्ये एकसमान रंग कोड लागू होईल. (हेही वाचा - Zebra Crossing in Mumbai: मुंबईत झेब्रा क्रॉसिंग आता नव्या रंगात, प्रथमच दिसणार लाल आणि पांढऱ्या रंगांचे पट्टे)

पूर्वी, बीजेडी सरकारच्या काळात, सर्व सरकारी शाळा आणि अधिकृत इमारती हिरव्या रंगात रंगवल्या जात होत्या. तथापि, नवीन सरकारने पदभार स्वीकारल्यानंतर, अधिकृत इमारतींचा रंग नारंगी-तांबडी रंगाच्या बॉर्डरसह हलक्या नारंगी रंगात बदलला. सत्ता हाती घेतल्यानंतर काही महिन्यांनी, भाजप सरकारने इयत्ता नववी आणि दहावीच्या शालेय गणवेशाचा रंग आणि डिझाइन हिरव्या रंगावरून हलक्या तपकिरी आणि मरून रंगात बदलला.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement