Akshaya Tritiya 2023 Gold Rates: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याचे दर कमी होण्याची शक्यता; ज्वेलर्सच्या विक्रीत 20% घट अपेक्षित

मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी सोने खरेदीमध्ये 20 टक्क्यांनी घट होण्याची शक्यता

Gold | Photo Credits: Pixabay.com)

सोन्याच्या किमतीत मागील काही दिवसांपासून मोठी वाढ पहायला मिळाली आहे. सोन्याचे दर60,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास आहे. यामुळे या अक्षय्य तृतीयेला ग्राहकांची सोन्याची मागणी कमी होण्याची शक्यता आहे. ज्वेलर्सच्या विक्रीत सुद्धा 20 टक्क्यांनी घट होण्याची अपेक्षा आहे. "सोन्याचा भाव 60,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे गेल्याने ग्राहक सोने खरेदीपासून दुर आहेत. याचा परिणाम अक्षय्य तृतीयेच्या दरम्यान विक्रीवर होईल.  अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी हे शुभ मानले जाते. मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी सोने खरेदीमध्ये 20 टक्क्यांनी घट होण्याची शक्यता असल्याचे ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे (GJC) चेअरमन सैयाम मेहरा यांनी सांगितले. (Akshaya Tritiya 2023 Date: अक्षय तृतीया कधी आहे? तारीख शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या)

अक्षय्य तृतीयेच्या काळात 40 टक्के व्यवसाय दक्षिणेत, 25 टक्के पश्चिमेला, 20 टक्के पूर्वेला आणि उर्वरित 15 टक्के उत्तरेत केला जातो, सध्या देशांतर्गत बाजारात सोन्याचा दर 60,280 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. GJC चे माजी अध्यक्ष आणि NAC ज्वेलर्स (चेन्नई) चे व्यवस्थापकीय संचालक अनंथा पद्मनाभन म्हणाले की, या अक्षय्य तृतीयेला सोन्याच्या उच्च दराचा परिणाम ग्राहकांच्या मागणीवर होईल.

"आम्ही आधीच सोन्याच्या किमतीत अचानक वाढ झाल्याचा परिणाम पाहत आहोत आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत या अक्षय्य तृतीयेला विक्रीत 10 टक्क्यांनी घट होण्याची आम्हाला अपेक्षा आहे. व्हॉल्यूमच्या संदर्भात, आम्हाला 20 टक्क्यांनी घट अपेक्षित आहे. मात्र, सोन्याच्या दरात अचानक घट झाल्यास विक्रीला चालना मिळेल, असेही अनंथा पद्मनाभन म्हणाले.