IPL Auction 2025 Live

Akasa Air विमानामध्ये मुंबई-वाराणसी बॉम्बची धमकी; सारे सुरक्षित

फ्लाइटमध्ये 159 प्रवासी, 1 अर्भक आणि 6 ऑपरेटिंग ऑपरेटिंग क्रू सदस्यांचा समावेश आहे.

Akasa-Air (Photo Credits: ANI)

वाराणसी एअरपोर्ट वर Akasa Air च्या विमानामध्ये बॉम्ब असल्याच्या घटनेने खळबळ पसरली होती. मुंबई - वाराणसी विमानामध्ये ही धमकी सोशल मीडीया द्वारा मिळाली होती. The Air Traffic Control कडून ही माहिती पायलटला देण्यात आली. त्यानंतर Emergency Procedures चे पालन करून आले आणि विमान वाराणसी येथे उतरवण्यात आले. विमान वेगळ्या धावपट्टीवर उतरले आणि प्रवाशांना लगेच खाली उतरवण्यात आले. सीआयएसएफच्या जवानांनी सुमारे तासभर विमानाचा कसून शोध घेतला. तपासणीत काहीही आढळून आले नाही.

वाराणसी विमानतळाचे संचालक पुनीत गुप्ता म्हणाले, “सर्व काही सामान्य आहे. बॉम्बची माहिती मिळताच विमानतळ प्राधिकरणाने पूर्ण खबरदारी घेतली आणि तपासणी केली आणि सर्व काही सामान्य असल्याचे दिसून आले. हे विमान फक्त वाराणसीला येत होते आणि ते इथे उतरायचे होते. होय, खबरदारीचा उपाय म्हणून ते वेगळ्या धावपट्टीवर उतरवण्यात आले.”

Akasa Air च्या विमानामध्ये 166 प्रवासी होते. फ्लाइटमध्ये 159 प्रवासी, 1 अर्भक आणि 6 ऑपरेटिंग ऑपरेटिंग क्रू सदस्यांचा समावेश आहे.सुरक्षा प्रोटोकॉलचा एक भाग म्हणून, विमान कंपनीने सर्व 16 विमानतळांना बॉम्बच्या धोक्याची माहिती दिली आणि त्यांना अलर्टवर ठेवले, असे प्रवक्त्याने सांगितले.