Gen Bipin Rawat's Chopper Crash: IAF कडून Tri-Service Inquiry चे आदेश, Air Marshal Manavendra Singh च्या नेतृत्त्वाखाली चौकशी; संरक्षणमंत्री Rajnath Singh यांची लोकसभेत माहिती
ग्रुप कॅप्टन वरुण सिंह वेलिंगटन मधील मिलिट्री हॉस्पिटल मध्ये लाइफ सपोर्ट वर आहेत. त्यांना वाचवण्याचे सारे प्रयत्न केले जात असल्याचेही संरक्षण मंत्र्यांनी लोकसभेत सांगितले आहे.
भारतीय जवानांसह देशातील जनतेला काल लष्कराच्या हॅलिकॉप्टर अपघाताने व्यथित केले आहे. सीडीएस बिपीन रावत (Gen Bipin Rawat), त्यांच्या पत्नी आणि सशस्त्र दलातील काही जवान असे 13 जणांचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला आहे. आज याबाबत भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग (Defence Minister Rajnath Singh ) यांनी निवेदन दिली आहे. लोकसभेमध्ये बोलताना त्यांनी या दुर्घटनेवर हळहळ व्यक्त करताना संबंधित दुर्घटनेची चौकशी देखील होणार असल्याचं सांगितलं आहे. यासाठी IAF कडून Tri-Service Inquiry चे आदेश आहेत. Air Marshal Manavendra Singh च्या नेतृत्त्वाखाली चौकशी केली जाणार आहे त्याचं काम सुरू झाल्याचंदेखील सांगण्यात आलं. Marshal Manavendra Singh हे इंडियन एअर फोर्सच्या ट्रेनिंग कमांडचे कमांडर आहेत सोबतच ते हेलिकॉप्टर पायलट देखील आहेत. नक्की वाचा: Military Chopper Crashes in Tamil Nadu: हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस बिपीन रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह राजनाथ सिंह ते राहुल गांधी यांनी वाहिली श्रद्धांजली.
दरम्यान काल (8 डिसेंबर) वायूसेनेचं IAFMi17V5 हे हेलिकॉप्टर सकाळी 11 वाजून 48 मिनिटांनी सुलूर एअर बेस वरून उडाले. 12.15 पर्यंत ते वेलिंग्टन मध्ये उतरणं अपेक्षित होते मात्र 12.08 च्या सुमारास सुलूर एअर बेस वरील एअर ट्रॅफिक कंट्रोल सोबत या हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसोबतच जवळच्या कॅम्प मधून बचाव आणि शोधकार्य सुरू झाले. सार्या जखमींना वेलिंग्टनच्या मिलिटरी हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले मात्र 14 पैकी 13 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये CDS Gen Bipin Rawat, त्यांच्या पत्नी मधूलिका रावत सोबतच ब्रिगेडियर एलएस लिडर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, एन के गुरसेवक सिंग, एनके जितेंद्र, विवेक कुमार, बी साई तेजा आणि हवालदार सतपाल होते. यांच्यावर उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार उद्या (10 डिसेंबर) दिल्लीमध्ये होणार आहेत.
Air Marshal Manvendra Singh
दरम्यान ग्रुप कॅप्टन वरुण सिंह वेलिंगटन मधील मिलिट्री हॉस्पिटल मध्ये लाइफ सपोर्ट वर आहेत. त्यांना वाचवण्याचे सारे प्रयत्न केले जात असल्याचेही संरक्षण मंत्र्यांनी लोकसभेत सांगितले आहे. लोकसभा आणि राज्य सभा मध्ये खासदारांनी या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)