Air India Urination Incidents: एअर इंडियाच्या विमानात सहप्रवासाच्या अंगावर लघुशंका प्रकरणी 4 केबिन क्रूला नोटीस; पायलट डी रोस्टर

नंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपीला बंगळूरू मधून अटक केली आहे.

Representational Image (File Photo)

एअर इंडिया (Air India) च्या विमानात सहप्रवाशाच्या अंगावर लघूशंका (Urination) करण्याच्या दोन एकापाठोपाठ झालेल्या घटना सध्या चर्चेमध्ये असताना या किळसवाण्या प्रकारावर अनेक स्तरातून रोष आणि संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या आहेत. एअर इंडियाने आता त्याची दखल घेत 4 केबिन क्रु कर्मचार्‍यांना आणि एका पायलटला नोटीस बजावली आहे. दरम्यान पायलटला या प्रकरणी चौकशी सुरू असताना डी रोस्टर देखिल करण्यात आलं आहे. Air India CEO, Campbell Wilson,यांनी शुक्रवारी एअरलाइन कर्मचार्‍यांना "बोर्डवरील कोणत्याही अयोग्य वर्तनाची माहिती लवकरात लवकर अधिकाऱ्यांना कळवण्यास सांगितले आहे. यामध्ये जी प्रकरणं निकाली लागली आहेत त्याचा देखील समावेश करण्यात आला आहे.

Air India कर्मचार्‍यांना लिहलेल्या पत्रामध्ये सीईओ विल्सन यांनी विमानात जे नियमांचं पालन करत नाही त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज असल्याचं सांगितलं आहे. विमान उड्डाणांवरील अप्रिय घटनांची माहिती अधिकार्‍यांना देण्याच्या महत्त्वाचा त्यांनी पुनरुच्चार केला आहे.जरी क्रूचा विश्वास असेल की एखादी घटना निकाली निघाली आहे त्याची माहिती अधिकार्‍यांना देणं गरजेचे आहे.

शुक्रवारी रात्री दिल्ली पोलिसांनी मुंबईचा रहिवासी असणार्‍या शंकर मिश्रा याला अटक केली आहे. त्याच्यावर 26 नोव्हेंबरच्या एअर इंडियाच्या न्यूयॉर्क - दिल्ली दरम्यानच्या विमानात महिला सहप्रवाशाच्या अंगावर लघवी केल्याचा आरोप आहे. नक्की वाचा: Air India च्या विमानात मद्यधुंद पुरुष प्रवाशाचा धिंगाणा, महिला प्रवाशाच्या ब्लँकेटवर केली लघवी.

महिला सहप्रवाशाने एअर इंडियाला दिलेल्या तक्रारीच्या आधारे 4 जानेवारीला एफआयआर नोंदवण्यात आला होता. नंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपीला बंगळूरू मधून अटक केली आहे.