Air India Taken: एअर इंडियाचे टाटाला अधिकृत अधिकार मिळाल्यानंतर आजपासून नव्याने सुरु होणार सेवा, नागरिकांचे 'अशा' पद्धतीने केले जाणार स्वागत
टाटा समूहाने जवळजवळ 69 वर्षानंतर पुन्हा एकदा एअर इंडियावर आपले अधिकृत अधिकार मिळवले आहेत. त्यानुसार आजपासून टाटा समूहाच्या अंतर्गत एअर इंडिया आता नव्याने काम सुरु करणार आहे.
Air India Taken: टाटा समूहाने जवळजवळ 69 वर्षानंतर पुन्हा एकदा एअर इंडियावर आपले अधिकृत अधिकार मिळवले आहेत. त्यानुसार आजपासून टाटा समूहाच्या अंतर्गत एअर इंडिया आता नव्याने काम सुरु करणार आहे. तत्पूर्वी एअर इंडियाच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे खास पद्धतीने स्वागत केले जाणार आहे. या संबंधित एक परिपत्रक सुद्धा जाहिर करण्यात आले आहे. (India's Richest Man: मुकेश अंबानी यांना मागे टाकून Gautam Adani बनले भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; जगात 11व्या क्रमांकावर पोहोचले)
परिपत्रकानुसार, विमानाच्या कॅप्टनद्वारे विमानात घोषणा केली जाणार आहे. तर 'प्रिय ग्राहक मी तुमचा कॅप्टन बोलत आहे. आजच्या ऐतिहासिक उड्डाणात तुमचे स्वागत आहे.आजचा दिवस खास आहे कारण एअर इंडिया 7 दशकानंतर अधिकृतपणे पुन्हा एकदा टाटा समूहाचा भाग बनला आहे. आपण एका नव्या जोशसह एअर इंडियाच्या या विमानात आणि प्रत्येक फ्लाइटमध्ये तुमचे स्वागत करण्यासाठी उत्सुक आहोत. भविष्यातील एअर इंडियामध्ये तुमचे स्वागत आहे. अपेक्षा आहे तुमचा प्रवास मंगलमय व्हावा.'
टाटा समूहाने म्हटले की, सुुरुवातीच्या 5 फ्लाइट्समध्ये त्यांच्याकडून फ्री मध्ये जेवण देणार आहेत. यामध्ये मुंबई-दिल्लीतील दोन फ्लाइट्स AI864 आणि AI687 यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त AI945 मुंबई येथून अबुधाबी आणि AI639 मुंबई येथून बंगळुरुच्या फ्लाइट्सच्या नावांचा सहभाग आहे. तसेच मुंबई-न्यूयॉर्कच्या मार्गावर ही चालणाऱ्या फ्लाइटमध्ये मोफत जेवणे दिले जाणार आहे. टाटा समूहाने म्हटले की, जेवणे हे टप्प्याटप्प्यानुसार वाढवले जाणार आहे.(Indian Railway: प्रवासादरम्यान रात्री 10 नंतर रेल्वे डब्यात मोठ्याने बोलण्यास बंदी, भारतीय रेल्वेचा नवा नियम)
एअर इंडियाची सुरुवात टाटा समूहाने 1932 मध्ये केली होती. तर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1953 मध्ये तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी विमान कंपनीचे राष्ट्रीयकरण केले होते. सरकारने एअर इंडियाला टाटा समूहाला सोपवण्यापूर्वी त्यांची सहाय्यक कंपनी (AIAHL) मध्ये असलेल्या 61,000 कोटी रुपयांचे जुने कर्ज आणि अन्य देयक सुद्धा पूर्ण केली आहेत. विमान कंपनीवर 31 ऑगस्ट 2021 पर्यंत एकूण 61,562 कोटी रुपयांचे कर्ज होते. त्यापैकी टाटा समूहाने 15,300 कोटी रुपयांचे कर्ज स्वत:वर घेतले आणि उर्वरित 75 टक्के जवळजवळ 46 हजार कोटींचे कर्ज एआयएचएल यांच्याकडे हस्तांतरित केले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)