Air India घरवापसी नंतर Ratan Tata यांनी व्यक्त केल्या भावना, म्हणाले 'Welcome Back'
एअर इंडिया (Air India) कंपनी पुन्हा एकदा टाटा ग्रुपकडे (Tata Sons) आली आहे. तब्बल 68 वर्षांनी एअर इंडिया कंपनीची टाटा ग्रुपमध्ये घरवापसी झाली आहे. टाटा सन्सने एअर इंडिया पुन्हा एकदा केंद्र सरकारकडून खरेदी केले. 18 हजार कोटी रुपयांना टाटाने एअर इंडिया खरेदी केली. एअर इंडियाची मालकी मिळविण्यासाठी टाटा सन्सने एअर इंडियासाठी सर्वात मोठी बोली लावली.
एअर इंडिया (Air India) कंपनी पुन्हा एकदा टाटा ग्रुपकडे (Tata Sons) आली आहे. तब्बल 68 वर्षांनी एअर इंडिया कंपनीची टाटा ग्रुपमध्ये घरवापसी झाली आहे. टाटा सन्सने एअर इंडिया पुन्हा एकदा केंद्र सरकारकडून खरेदी केले. 18 हजार कोटी रुपयांना टाटाने एअर इंडिया खरेदी केली. एअर इंडियाची मालकी मिळविण्यासाठी टाटा सन्सने एअर इंडियासाठी सर्वात मोठी बोली लावली. एअर इंडियासाठी साठी स्पाईस जेटचे मालक संजय सिंह यांनी 15 हजार कोटी रुपयांची बोली लावली होती. भआरत सरकारने एअर इंडियाच्या विक्रीसाठी रिजर्व प्राइस 12906 कोटी रुपये निश्चित केली होती. दरम्यान, एअर इंडिया कंपनी टाटाच्या ताब्यात आल्यानंतर चेअरमन रतन टाटा (Ratan Tata) यांनी आनंद व्यक्त केला आहे.
रतन टाटा यांचे ट्विट
रतन टाटा यांनी Air India ची बोली Tata Sons जिंकल्याबद्दल ट्विटच्या माध्यमातून शुभेच्छा देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. टाटा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'Welcome Back, Air India' . एअर इंडियाचे स्वागत करताना रतन टाटा यांनी एक जुना फोटो शेअर केला आहे. हा फोटो 1932 मध्ये एअर इंडियाची सुरुवात करणारे उद्योगपती जे. आर.डी. टाटा यांचा आहे. एअर इंडियासोबत जेआरडी टाटा यांचा एक संदेशही रतन टाटा यांनी शेअर केला आहे. (हेही वाचा, Tata Group कडून केले जाणार आता Air India चे परिचालन, सर्वाधिक रक्कम लावत जिंकली बोली)
दरम्यान, आपल्या संदेशात रतन टाटा यांनी म्हटले आहे की, Air India टाटा समूहाकडे परतण्याचे वृत्त खूपच चांगले आहे. ही एक आनंदाची बातमी आहे. एअर इंडिया पुन्हा एकदा उभी करण्यासाठी कठोर मेहनत करावी लागेल. सोबतच एव्हिएशन मार्केटमध्येही टाटा समूहाला उभारण्यासाठी पुरेसा अवकाश मिळेल.
ट्विट
भारत सरकारची विमान कंपनी एअर इंडिया (Air India) अधिगृहीत करण्यासाठी टाटा समूह (Tata Group) द्वारा लावण्यात येणाऱ्या बोलीस मंजूरी मिळाल्याच्या वृत्ताचे गुंतवणूक आणि सार्वजनिक संपत्ती प्रबंधन (Department of Public Property Management) म्हणजेच दीपम (DIPAM) विभागाने या वृत्ताचे खंडन केले होते. मात्र, प्रसारमाध्यमांनी दिलेले वृत्त वास्तवावर आधारीत असल्याचे आज पुढे आले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)