एअर इंडियाचे विमान (छायाचित्र: X/ @airindia/ANI)

Aircraft Emergency: विमान वाहतुकीच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण करणाऱ्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये, एअर इंडिया (Air India) आणि सौदीया एअरलाइन्सच्या (Saudia Airlines) विमानांना या आठवड्यात तांत्रिक बिघाडाचा सामना करावा लागला, ज्यामुळे आपत्कालीन उपाययोजना कराव्या लागल्या. या घटनांमुळे हवाई प्रवासाच्या सुरक्षिततेबाबत नव्याने चिंता निर्माण झाली आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, एअर इंडिया या हवाई वाहतुक कंपीनेच बोईंग 787-8 ड्रीमलायनर (Air India Flight Boeing 787-8 Dreamliner) हाँगकाँगहून दिल्लीकडे जात असताना पायलटला विमानातील संभाव्य प्रणाली बिघडल्याचे निदर्शनास आले. ज्यामुळे त्याने विमान हवेतून परत हाँगकाँगला वळवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, दुसऱ्या बाजूला, सौदी एअरलाईन्सच्या विमानाला लखनऊ विमानतळावर उतरताना लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्याचे पुढे आले. त्यामुळे एकाच दिवशी विमानात तांत्रिक बिघाडाच्या दोन घटना पुढे आल्या.

विमान आणि प्रवासी सुरक्षीत

एअर इंडिया या हवाई वाहतुक कंपीनेच बोईंग 787-8 ड्रीमलायनर विमान सुरक्षितरित्या हाँगकाँगमध्ये उतरले आणि सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे सांगण्यात आले. तांत्रिक पथक विमानाची तपासणी करत असून, नेमका बिघाड काय होता हे शोधले जात आहे. दुसऱ्या घटनेत, Saudia Airlines Flight SV3112 ज्यात 250 हज यात्रेकरू होते, लखनऊच्या चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्याचे आढळले. हे विमान शनिवारी रात्री 10:45 वाजता जेद्दाहहून निघाले होते आणि रविवारी सकाळी 6:30 वाजता लखनऊत पोहोचले. विमान उतरल्यानंतर, विमानाच्या डाव्या चाकातून धूर व ठिणग्या निघत असल्याचे विमानतळ कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. (हेही वाचा, Technical Fault in Saudia Airlines Flight: सौदी अरेबियाहून येणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड; लखनऊ विमानतळावर लँडिंग दरम्यान चाकातून निघाल्या ठिणग्या)

विमानात हायड्रॉलिक लिकेज

पायलटने तत्काळ विमान थांबवून एअर ट्रॅफिक कंट्रोलला माहिती दिली. आपत्कालीन प्रतिसाद पथके तत्काळ घटनास्थळी पोहोचली आणि सर्व प्रवासी व क्रू सदस्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. प्राथमिक तपासणीत असे दिसून आले की, हायड्रॉलिक लिकेजमुळे चाकाच्या यंत्रणेत उष्णता निर्माण होऊन ठिणग्या उडाल्या असाव्यात. 20 मिनिटांत परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.(हेही वाचा - Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातातील 80 मृतांचे DNA नमुने जुळले; 33 जणांचे मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द)

विमानामध्ये बिघाड झाल्याचा पायलटला संशय

गुजरात विमान अपघात

दरम्यान, या घटना घडण्याआधी काही दिवसांपूर्वीच गुजरातमधील अहमदाबाद येथील मेघानीनगर (Meghaninagar) येथे एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता. अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान 12 जून रोजी दुपारी 1:39 वाजता उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच कोसळले. या दुर्घटनेत 242 पैकी 241 प्रवासी व कर्मचारी मृत्युमुखी पडले, तसेच 29 नागरिकांचा मृत्यू झाला, कारण हे विमान एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरावर कोसळले. या घटनेमुळे संपूर्ण भारतभर सन्नाटा पसलला आहे.