Air India Flight AI 171 Crash: गुजरातचे माजी मुख्यमंत्री Vijay Rupani यांची डीएनए चाचणी मधून पटली ओळख
Air India Flight AI 171 Crash मधील डीएनए चाचणी मधून आतापर्यंत 32 बळींची ओळख पटली आहे. 12 कुटुंबांनी त्यांच्या प्रियजनांचे अवशेष आधीच घेतले आहेत.
Air India Flight AI 171 च्या भीषण दुर्घटनेनंतर अनेक प्रवासी जळल्याने त्यांच्या मृतदेहाची ओळख पटवणं कठीण झाले. सध्या डीएनए चाचणीच्या माध्यमातून मृतदेहांची ओळख पटवून ते कुटुंबियांच्या हाती दिले जात आहे. 241 मृतांमध्ये एक गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी (Vijay Rupani) देखील आहेत. विजय रूपाणींच्या मृतदेहाची आज सकाळी सव्वा अकराच्या सुमारास ओळख पटली आहे. डीएनए चाचणीच्या माध्यमातून त्यांचीही ओळख पटवण्यात आल्याची माहिती गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी जाहीर केले आहे. 12 जूनला झालेल्या या अपघातामध्ये 241 विमान प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलचे अतिरिक्त अधीक्षक डॉ. रजनीश पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यांचे डीएनए यशस्वीरित्या जुळले आहेत अशा मृतांचे अवशेष आता कुटुंबांना दिले जात आहेत. प्रत्येक शोकाकुल कुटुंबाला एक समर्पित सहाय्यक पथक मदत करत आहे, ज्यामध्ये एक वरिष्ठ अधिकारी, एक पोलिस अधिकारी आणि एक प्रशिक्षित समुपदेशक यांचा समावेश आहे. नक्की वाचा: संजय गांधी ते माधवराव सिंधिया; विमानअपघातात प्राण गमावलेले भारतीय नेते.
Gujarat Home Minister Harsh Sanghvi यांची माहिती
#WATCH | #AhmedabadPlaneCrash | Gujarat Home Minister Harsh Sanghvi says "Former Gujarat CM Vijay Rupani lost his life during the Air India crash in Ahmedabad on 12th June. Today, at around 11:10 AM, his DNA has matched. He worked for the people of the state for several years..." pic.twitter.com/4QYqOh2Eti
— ANI (@ANI) June 15, 2025
डॉ. पटेल यांनी पुष्टी केली की डीएनए चाचणी मधून आतापर्यंत 32 बळींची ओळख पटली आहे. 12 कुटुंबांनी त्यांच्या प्रियजनांचे अवशेष आधीच घेतले आहेत, तर अधिकारी उर्वरित मृतदेह मिळविण्यासाठी इतर नातेवाईकांच्या येण्याची वाट पाहत आहेत.
दरम्यान, Air India Flight AI 171, अपघातातील मृतांची संख्या 250 वर पोहोचली आहे. रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी बीजे मेडिकल कॉलेजचे आणखी चार विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा बळींमध्ये समावेश असल्याची पुष्टी केल्यानंतर या अपघातातील मृतांची संख्या 250 वर पोहोचली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

