Air India Express Flight Makes Emergency Landing: उड्डाण करताच एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानात निघाला धूर; तिरुअनंतपुरममध्ये करावे लागले इमर्जन्सी लँडिंग
यानंतर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमानातील सर्व प्रवासी आणि चालक दलातील सदस्य सुरक्षित आहेत.
Air India Express Flight Makes Emergency Landing: तिरुअनंतपुरम (Thiruvananthapuram) हून मस्कतला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेस (Air India Express Flight) च्या विमानाला उड्डाण केल्यानंतर काही वेळातच पुन्हा धावपट्टीवर इमर्जन्सी लँडिंग (Emergency Landing) करावे लागले. वास्तविक, विमानाने उड्डाण करताच त्यातून धूर निघू लागला. विमानातून धूर निघत असल्याने एकच खळबळ उडाली. विमानाने तातडीने तिरुवनंतपुरम विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग केले. या विमानात 148 प्रवासी होते.
विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित -
एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, विमानाने उड्डाण करताच धुराचे लोट दिसू लागले. यानंतर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमानातील सर्व प्रवासी आणि चालक दलातील सदस्य सुरक्षित आहेत. प्रवाशांच्या पुढील प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे. विमानात धूर कशामुळे आला याची तांत्रिक तपासणी करण्यात येणार आहे. एअर इंडिया एक्स्प्रेसने प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. (हेही वाचा - Air India Express ची 70 पेक्षा जास्त इंटरनॅशनल, डोमेस्टिक फ्लाईट्स रद्द; वरिष्ठ क्रु Mass Sick Leave वर)
टेक ऑफ दरम्यान विमानातून निघाला धूर -
प्राप्त माहितीनुसार, एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट IX 549 मध्ये टेक ऑफ दरम्यान धूर निघत असल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सकाळी 8.39 वाजता घडली. धावपट्टीवर उड्डाण करत असताना विमानातून धूर निघू लागला. धूर कशामुळे आला याची चौकशी करण्यात येणार आहे. आम्ही विमान ऑपरेशनच्या प्रत्येक पैलूमध्ये सुरक्षिततेला प्राधान्य देतो. प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत, असं एअर इंडिया एक्सप्रेसने आपल्या निवेदनात म्हटले आहे.