Air India कडून कर्मचार्यांना ड्रेस कोड बाबत नियमावली जारी; Ripped Jeans, Shorts, Flip Flops वर बंदी
यामध्ये विमानतळावर रिपोर्टिंग करण्याच्या वेळेस कर्मचार्यांनी रिप्ड जीन्स, फ्लिप फॉप्ल्स, टी-शर्ट्स घालून येण्यावर बंदी घातली आहे.
एअर इंडिया (Air India) कंपनीकडून त्यांच्या कर्मचार्यांना ड्रेस कोड बाबत एक नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. यामध्ये विमानतळावर रिपोर्टिंग करण्याच्या वेळेस कर्मचार्यांनी रिप्ड जीन्स, फ्लिप फॉप्ल्स, टी-शर्ट्स घालून येण्यावर बंदी घातली आहे. एअर कर्मचार्यांनी फॉर्मल ड्रेस मध्येच विमानतळावर दाखल व्हावं अशा सूचना सार्या ग्रेडमधील कर्मचार्यांना करण्यात आल्या आहेत. मंगळवारी एअर इंडियाच्या डिव्हेसमेंटच्या अंतिम तारखेची कालमर्यादा वाढवत असल्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.
एअर इंडियाचा प्रत्येक कर्मचारी हा विमानसेवेसाठीचा त्यांचा ब्रॅन्ड अॅम्बॅसेडर आहे. तो विमान कंपनीचं प्रतिनिधित्त्व करत असतो. दरम्यान जेव्हा आणि जेथे गणवेश घालणं बंधनकारक आहे तेथे तो घातलाच गेला पाहिजे. मात्र युनिफॉर्म व्यतिरिक्त कामावर असताना प्रत्येक कर्मचार्याने नीट-नेटक्या कपड्यांमध्ये असणं बंधनकारक आहे. हा नियम उच्च पदस्थ अधिकार्यांपासून तात्पुरत्या, कॉन्ट्रॅक्ट वर असणारे कर्मचारी ते इंटर्नपर्यंत सार्यांना लागू असतील.
एअर इंडियाने पुरूष कर्मचार्यांना फॉर्मल ट्राऊझर आणि शर्ट घालण्याचे तर महिलांना भारतीय किंवा पाश्चिमात्य फॉर्मल ड्रेसमध्ये उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान कपडे नीट इस्त्री केलेले असावेत. पुरूषांनी क्लीन शेव्ह असणं आवश्यक आहे. केश रचनेपासून नियमित ड्रेसिंग सेन्स पाळणं आवश्यक आहे. यामध्ये पारदर्शक कपडे, अति तंग, आखूड कपडे टाळावेत. तसेच रिप्ड जिंस, फ्लिप फॉप्स, सॅन्डल्स असे कॅज्युएअल ड्रेसिंगदेखील करता येणार नाही असं बजावण्यात आले आहे.
दरम्यान नियमांचं उल्लंघन करणार्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असं सांगण्यात आले आहे.