AIADMK Dalit MLA A Prabhu Marriage With Brahmin Girl: अन्नाद्रमुक आमदार ए. प्रभु यांचे ब्राह्मण मुलीसोबत लग्न, जातीयतेला मुठमाती देत 'आंतरजातीय विवाह'

आमदार प्रभु हे गेल्या काही दिवसांपासून एस. सौंदर्या हिच्या प्रेमात होते. प्रभु यांनी सौंदर्या हिच्या घरातल्यांकडे विवाहासाठी रितसर परवानगी माहितली होती. परंतू, सौंदर्याचे वडील एस. स्वामीनाथन यांनी प्रभु यांच्या प्रस्तावास तीव्र विरोध दर्शवला. ए. प्रभु यांनी म्हटले आहे की, त्यांनी आपल्या आईवडीलांच्या आशीर्वादाने विवाह केला आहे.

MLA A Prabhu marries With S.Soundarya | (Photo Credits: Facebook)

Love, Marriage And Politics: देशात एका बाजूला धर्म आणि जातीयतेच्या भींती अधिक उंच.. उंच होत असताना एक सुखकारक आणि कौतुकास्पद बातमी आहे. जातीयतेची कुंपणे तोडत अन्नाद्रमुक ( एआयएडीएमके AIADMK ) म्हणजेच अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (All India Anna Dravida Munnetra Kazhagam) पक्षाचे दलित आमदार ए प्रभु (A Prabhu) यांनी एका ब्राह्मण  तरुणीशी विवाह केला आहे. (AIADMK Dalit MLA A Prabhu Marriage With Brahmin Girl) एस. सौंदर्या असे या मुलीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार आमदार ए प्रभु यांचा हा प्रेमविवाह आहे. आमदार ए प्रभु यांच्या आंतरजातीय  विहावामुळे (Inter-Caste Marriage) तमिळनाडूच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, अन्नाद्रमुक पक्षाचे आमदार ए. प्रभु, हे 36 वर्षांचे आहेत. त्यांनी 19 वर्षाच्या तरुणीसोबत प्रेमविवाह केला आहे. ए प्रभु हे दलित कुटुंबातून येतात. तर त्यांची प्रेयसी ब्राह्मण कुटुंबातून येते. ए प्रभु हे कल्लाकुरीची विधानसभा मतदारसंघातून अन्नाद्रमुक पक्षाचे विधानसभेवर प्रतिनिधित्व करतात. ए. प्रभु यांची प्रेयसी ही महाविद्यालयीन विद्यार्थीनी आहे. तरुणीच्या कुटुंबीयांचा विरोध झुगारुन देत ए प्रभु यांनी आपला संसार थाटला आहे.

MLA A Prabhu marries With S.Soundarya | (Photo Credits: Facebook)

दरम्यान, एका स्थानिक मंदिराचे पुजारी असलेले तरुणीचे वडील एस. स्वामीनाथन यांनी आरोप केला आहे की, आमदार ए. प्रभु यांनी आपल्या मुलीचे (एस. सौंदर्या) अपहरण केले आणि गुपचूप लग्न केले. एस. स्वामीनाथन यांनी आत्महनाचाही प्रयत्न केला. जिल्हा पोलिसांनी त्यांच्या विरोधात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (हेही वाचा, चंद्रपूर: आंतरजातीय लग्नाला विरोध करणा-या सास-याची हत्या करून माथेफिरू जावयाने सासूवरही केला जीवघेणा हल्ला)

MLA A Prabhu marries With S.Soundarya | (Photo Credits: Facebook)

सांगितले जात आहे की, एस. सौंदर्या हिने आपल्या आईवडीलांचे घर सोडले आणि ती ए. प्रभु यांच्या घरी पोहोचली. पुढे जाऊन त्यांनी विवाह केला. ए. प्रभु यांचे आईवडील अन्नाद्रमुक पक्षाशी संबंधित आहेत. (हेही वाचा, स्कोलिऑसिसच्या शस्त्रक्रियेचा व्रण दाखवत जागृती करण्यासाठी लंडनची राजकन्या युजिनानं निवडला बॅकलेस वेडिंग ड्रेस !)

दुसऱ्या बाजूला आमदार ए. प्रभु यांनी त्यांच्यावरील आरोपांचे खंडण केले आहे. प्रभु यांनी म्हटले आहे की, त्यांनी त्यांची प्रेयसी एस. स्वामीनाथन हिचे अपहरण केले नाही. तसेच, जबरदस्तीने विवाहही केला नाही. दोघांनी राजीखुसी विवाह केला आहे. प्रभु यांनी पत्नीच्या कुटुंबीयांना धमकी दिल्याच्या आरोपाचेही खंडण केले आहे. (हेही वाचा, समलैंगिक जोडी पहिल्यांदाच मुंबईत लग्नबेडीत अडकली)

एआएडीएमके आमदार ए. प्रभु फेसबुक पोस्ट

प्रभु हे गेल्या काही दिवसांपासून एस. सौंदर्या हिच्या प्रेमात होते. प्रभु यांनी सौंदर्या हिच्या घरातल्यांकडे विवाहासाठी रितसर परवानगी माहितली होती. परंतू, सौंदर्याचे वडील एस. स्वामीनाथन यांनी प्रभु यांच्या प्रस्तावास तीव्र विरोध दर्शवला. ए. प्रभु यांनी म्हटले आहे की, त्यांनी आपल्या आईवडीलांच्या आशीर्वादाने विवाह केला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now