Ahmedabad Shocker: महिलेने घटस्फोट मागितल्यावर पतीचे घृणास्पद कृत्य, सोशल मिडियावर पोस्ट केले खाजगी व्हिडिओ आणि फोटो; तक्रार दाखल

महिलेने आरोप केला आहे की, जेव्हा ती तिच्या पतीसोबत राहत होती तेव्हा दोघे एकच इन्स्टाग्राम अकाऊंट वापरत होते. ती माहेरी गेल्यानंतरही तिचा नवरा तिचे इन्स्टाग्राम खाते वापरत राहिला. ते दोघे व्हिडिओ कॉलद्वारे संपर्कात होते.

Mobile Phone PC- Pixabay

अहमदाबादमधील (Ahmedabad) मेमनगर परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका पतीने आपल्या पत्नीचे खाजगी आणि फोटो (Private Photos) सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. पत्नीने घटस्फोटाची मागणी केल्यानंतर पतीने सूड उगवण्यासाठी हे कृत्य केले. पत्नीने घटस्फोट मागितला व ती माहेरी निघून गेली. त्यानंतर संतापलेल्या पतीने पत्नीचे खाजगी व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल केले आणि त्यावर आक्षेपार्ह कमेंटही केली. त्यानंतर या 21 वर्षीय महिलेने तिच्या पतीवर ब्लॅकमेलिंग आणि ऑनलाइन छळ केल्याचा आरोप करत, शुक्रवारी घाटलोडिया पोलिसात तक्रार दाखल केली. त्याआधारे पोलिसांनी बदनामी आणि धमकीचा गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, महिलेचे वडोदरा येथील एका गावात राहणाऱ्या व्यक्तीशी एक वर्षापूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर तिने काही काळ पतीसोबत सासरच्या घरी घालवला. ती तिच्या पतीच्या संयुक्त कुटुंबात राहत होती. मात्र जेव्हा तिच्या सासरच्या लोकांनी तिच्यासोबत वाईट वागणूक सुरू केली, तेव्हा ती अहमदाबादमधील तिच्या माहेरी परतली. त्या ठिकाणी ती एका दुकानात काम करू लागली. महिलेने सांगितले की, तिला तिच्या सासरी त्वचेची गंभीर ऍलर्जी झाली होती. तिच्या पाठीवर आणि छातीवर फोड आले होते. (हेही वाचा: Muzaffarnagar Gang Rape: तरुण मेहुणी पाहून विकृती संचारली, सामूहिक बलात्कार करुन हत्या केली; मुझफ्फरनगर येथील खळबळजनक घटना)

महिलेने आरोप केला आहे की, जेव्हा ती तिच्या पतीसोबत राहत होती तेव्हा दोघे एकच इन्स्टाग्राम अकाऊंट वापरत होते. ती माहेरी गेल्यानंतरही तिचा नवरा तिचे इन्स्टाग्राम खाते वापरत राहिला. ते दोघे व्हिडिओ कॉलद्वारे संपर्कात होते. तिने एकदा आपली ऍलर्जी बरी झाली आहे हे पतीला समजावे म्हणून आपले शरीराचा काही भाग व्हिडीओ कॉलवर पतीला दाखवला. मात्र पतीने तिच्या संमतीशिवाय कॉल रेकॉर्ड केला. महिलेने सांगितले की, जेव्हा तिने सासरच्या घरी जाण्यास नकार दिला आणि घटस्फोटाची मागणी केली तेव्हा तिच्या पतीने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात त्याने तिची बदनामी करण्यासाठी तिचे खासगी फोटो आणि व्हिडिओ व्हॉट्सॲप स्टेटस आणि इन्स्टाग्रामवर अपलोड केले. अखेर सोशल मीडियावरील धमक्या आणि अपमानाला कंटाळून महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. घाटलोडिया पोलिसांनी भारतीय न्याय संहितेअंतर्गत धमकी आणि बदनामीची तक्रार नोंदवून तपास सुरू केला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now