Ahmedabad Fire: अहमदाबाद येथील कापड गोदामात लागलेल्या भीषण आगीत 12 जणांचा मृत्यू; बचावकार्य पूर्ण
बुधवारी गुजरातच्या अहमदाबाद (Ahmedabad) येथे कापड गोदामात (Textile Godown) भीषण आग (Fire) लागल्याने 12 जणांचा मृत्यू झाला. पिपलाज रोडवरील नानुकाका इस्टेट येथे असलेल्या या गोदामात लागलेल्या आगीत तीन जणांना वाचविण्यात यश आले.
बुधवारी गुजरातच्या अहमदाबाद (Ahmedabad) येथे कापड गोदामात (Textile Godown) भीषण आग (Fire) लागल्याने 12 जणांचा मृत्यू झाला. पिपलाज रोडवरील नानुकाका इस्टेट येथे असलेल्या या गोदामात लागलेल्या आगीत तीन जणांना वाचविण्यात यश आले. या क्षणी प्राप्त झालेल्या अहवालानुसार या अपघातात मृत्यू झालेल्या लोकांची संख्या वाढू शकते. माध्यमांच्या वृत्तानुसार, आगीमुळे इमारतीचा एक भाग कोसळल्याने हे मृत्यू झाले. रुग्णालयात पाठविलेल्यांपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या बचावकार्य पूर्ण झाले असल्याची माहिती मिळत आहे. अग्निशमन विभागाचे अधिकारी जयेश खडिया म्हणाले की, ढिगाऱ्याखालून 12 जणांना बाहेर काढून एलजी रुग्णालयात नेण्यात आले आहे.
ते पुढे म्हणाले, पिराना-पिपलाज रोडवरील इमारतीला आग लागून स्फोट झाला होता. या इमारतीतच गोदाम बांधले गेले होते. अहमदाबाद अग्निशामक आणि आपत्कालीन सेवा प्रमुखांच्या म्हणण्यानुसार, जवळच्या केमिकल युनिटमध्ये प्रथम स्फोट झाल्याची माहिती मिळाली, त्यानंतर वस्त्रोद्योगाच्या गोदामाची इमारत कोसळली व आग लागली. 12 जखमींपैकी 4 जणांना रुग्णालयात आणताना मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर चौघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर जखमींवर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेमध्ये 12 जणांचा मृत्यू झाला आहे.
#UPDATE: Death toll in the fire at a textile godown on Piplaj road in Ahmedabad rises to 12. #Gujarat
Rescue operation completed. https://t.co/FDYrfZP95i
— ANI (@ANI) November 4, 2020
रासायनिक युनिटमध्ये सलग 5 स्फोट झाल्याची चर्चा आहे. फॅब्रिक गोदाम मालकाचा आरोप आहे की हा केमिकल कारखाना बेकायदेशीरपणे चालविला जात होता. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही आग अत्यंत भीषण होती त्यामुळे आतमध्ये अडकलेले लोक बाहेर पडू शकले नाहीत. त्यांच्या मते, आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी अग्निशमन दलाला आणि पोलिसांना फोन केला, त्यानंतर 24 अग्निशमन इंजिन आणि 50 अग्निशमन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अखेर मोठ्या प्रयत्नांनी ही आग विझविली गेली.
पीएम मोदी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. शोकग्रस्त कुटुंबांबद्दल संवेदना व्यक्त केल्या तसेच जखमींची प्रकृती लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना केली.
(The above story first appeared on LatestLY on Nov 04, 2020 09:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

