आईनेच बनवला अश्लिल व्हिडिओ, मुलाकडून अल्पवयीन मुलीवर दीड वर्ष बलात्कार
अहमदाबाद येथे एका आई आणि मुलाने अल्पवयीन मुलीवर दीड वर्ष बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
अहमदाबाद येथे एका आई आणि मुलाने अल्पवयीन मुलीवर दीड वर्ष बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपी महिला हिचे कपड्यांचे दुकान आहे. त्यावेळी ही पीडित मुलगी तिच्या दुकानात कपडे खरेदी करण्यासाठी गेली असता त्यावेळी या महिलेशी तिची ओखळ झाली होती. त्यानंतर एकदा ड्रेस दाखवण्याचा बहाण्याने महिला आणि मुलाने तिला तिच्या घरी घेऊन गेले. पीडित मुलगीसुद्धा त्यांच्याबरोबर घरी गेली असता तिने तिथे भरपूर ड्रेस पाहिले. त्यामधील एक ड्रेस आवडला म्हणून तिने महिलेला सांगितले. तेव्हा महिलेने चेंजिंग रुममध्ये जाऊन कपडे बदलण्यास सांगितले असता महिलेने त्याचवेळी तिचा अश्लील व्हिडिओ मोबाईलवर शूट केला. पीडित मुलगी कपडे बदलून आल्यानंतर महिलेने तो व्हिडिओ मुलीली दाखवला असता तिने तो डिलिट करण्यासाठी विनंती केली. मात्र महिलेने तिचे एक ऐकले नाही. उलट तुझा हा अश्लिल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हारल करु नये म्हणून तिच्या मुलासोबत शारिरिक संबंध ठेवण्यासाठी तिला गळ घातली.(हेही वाचा-Wife Swapping: पॉर्न पाहून दोस्तासोबत सेक्स करण्यासाठी पतीचा बायकोवर दबाव; पालकांचाही मुलाला पाठींबा)
त्यानंतर महिलेच्या मुलानेसुद्धा या पीडित मुलीवर जवळजवळ दीड वर्ष बलात्कार केला. तर सातत्याने शारिरिक संबंध ठेवल्याने मुलीची प्रकृती अधिकच खालावली जात होती. शेवटी पीडित मुलीने हा सर्व धक्कादायक प्रकार तिच्या घरातील मंडळींना सांगितली. त्यावेळी घरातील मंडळींनी तातडीने पोलिसात धाव घेत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.