ऑगस्टा वेस्टलॅंड: 'हड्डीवाला कुत्ता' कोण? ख्रिश्चन मिशेल याची डायरी सीबीआयच्या हाती

या डायरीत 'हड्डीवाला कुत्ता' असा उल्लेख वारंवार आला आहे. तसेच, त्याचा सहकारी गाईडो हॅश्के याच्याशी झाल्येल्या मिशेल याच्या संवादातही अनेकदा 'हड्डीवाला कुत्ता' हा शब्दप्रयोग आला आहे.

AgustaWestland case | (Archived, edited, representative images)

AgustaWestland case : ऑगस्टा वेस्टलॅंड प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळाले आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभाग (Central Bureau of Investigation)अर्थाच सीबीआयला आता एका कुत्र्याचा शोध घ्यावा लागणार आहे. हा कुत्राही सादासुधा नाही तर, चक्क हड्डीवाला कुत्रा आहे. ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या ख्रिश्चन मिशेल याची एक डायरी (Christian Michel Dairy ) सीबीआयच्या हाती लागली आहे. या डायरीत 'हड्डीवाला कुत्ता' असा उल्लेख वारंवार आला आहे. तसेच, त्याचा सहकारी गाईडो हॅश्के याच्याशी झाल्येल्या मिशेल याच्या संवादातही अनेकदा 'हड्डीवाला कुत्ता' हा शब्दप्रयोग आला आहे. ऑगस्टा वेस्टलँडचा वरिष्ठ अधिकारी (लियोनार्डो), मिशेल हॅश्ले आणि कार्लो गेरोसा यांच्यात 8 फेब्रुवारी 2008मध्ये हा संवाद झाल्याचे पुढे आले आहे.

'हड्डीवाला कुत्ता' असा उल्लेख आलेल्या या संवादात व्हीव्हीआयपी चॉपर डीलमध्ये सीव्हीसी, संरक्षण सचिव (Defense Secretary), हवाई विभागाचे संयुक्त सचिव (Joint Secretary), एअरफोर्ट मेन्टेनन्स कमांड (AirFort Maintenance Command), हेलिकॉप्टरसाठी उड्डान मुल्यांकन करणाऱ्या टीमला बोर्डवर आणण्यासंदर्भात उल्लेख आहे. तपास यंत्रणेला एक नोट मिळाली ही नोट मिशेलने लिहिल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे. ही नोट अगदी सुरुवातीच्या काळात व्यवहारावर बोलणी करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या एका पार्टीबाबत आहे. (हेही वाचा, ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा: प्रमुख आरोपी क्रिश्चियन मिशेल भारताच्या ताब्यात)

प्रसारमाध्यमांनी या कथीत नोटच्या हवाल्याने दिलेल्य वृत्तात म्हटले आहे की, जीएच (गुइडो हॅश्के) याला कालच्या पार्टीबद्दल आभार व्यक्त करत आपेक्षा व्यक्त केली आहे की, कालच्या पार्टीत 'कुत्र्याला हड्डी आवडली असेल.' सीबीआय आणि ईडीला संशय आहे की, ही नोट एखाद्या भारतीय अधिकारी जो या कंत्राटामध्ये बोलणी (कॉन्ट्रॅक्ट डिल) करत आहे, अशा व्यक्तीसोबत असावी. तसेच, या व्यक्तिलाच हा सांकेतीक रुपात हा शब्दप्रयोग केला असावा.