Agni-5 Nuclear-Capable Ballistic Missile: अग्नी-5 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची भारताकडून यशस्वी चाचणी; 5,000 किमी पेक्षा अंतरावर मारा करण्याची क्षमता

ही चाचणी गुरुवारी (15 डिसेंबर) पार पडली. तब्बल 5,000 किमी अंतरापलीकडील लक्ष्याचा अचूक वेध घेत मारा करण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे.

Agni-5 | Photo Credit - Twitter/ANI)

भारताने अग्नी-5 बॅलेस्टीक क्षेपणास्त्राची (Agni-5 Nuclear-Capable Ballistic Missile) यशस्वी चाचणी केली आहे. ही चाचणी गुरुवारी (15 डिसेंबर) पार पडली. तब्बल 5,000 किमी अंतरापलीकडील लक्ष्याचा अचूक वेध घेत मारा करण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, अग्नी-5 बॅलेस्टीक या क्षेपणास्त्रावरील नवीन तंत्रज्ञान आणि उपकरणे प्रमाणित करण्यासाठी ही चाचणी घेण्यात आली. जी पूर्वीपेक्षा अधिक गुणवत्तापूर्ण आहे. या चाचणीमुळे आवश्यकता असल्यास या क्षेपणास्त्राची पुढची श्रीणी काढण्याची क्षमताही सिद्ध झाली आहे.

वृत्तात म्हटले आहे की, हे क्षेपणास्त्र वजनाला हलके आहे. तसेच ते संमिश्र साहित्य जोडून त्याचे वजन कमी केले आहे ज्यामुळे क्षेपणास्त्र लांब पल्ला गाठू शकेल. भारताने शेवटची अग्नी-5 चाचणी ऑक्टोबर 2021 मध्ये प्रक्षेपित केली होती. तिचे ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम बेटावरून अंदाजे 5:30 वाजता प्रक्षेपण करण्यात आले.

ट्विट

संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, तीन-स्टेज सॉलिड-इंधन इंजिनचा वापर करणारे हे क्षेपणास्त्र 5,000 किलोमीटरपर्यंतच्या श्रेणीतील लक्ष्यांवर अत्यंत उच्च क्षमतेने अचूकतेसह मारा करण्यास सक्षम आहे. अग्नी-5 ची यशस्वी चाचणी भारताच्या 'विश्वासार्ह किमान प्रतिबंध' या धोरणाशी सुसंगत आहे जी 'प्रथम वापर नाही' या वचनास सक्षमपणे वापर करते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif