IPL Auction 2025 Live

हैद्राबादच्या Agastya Jaiswal ने 14 व्या वर्षी संपादन केली पदवी; ठरला भारतामधील पहिला विद्यार्थी, 9 व्या वर्षी दिली होती दहावीची परीक्षा

असे करणारा तो भारतातील पहिला विद्यार्थी ठरला आहे.

Agastya Jaiswal (संग्रहित संपादित प्रतिमा)

हैदराबादच्या (Hyderabad) अगस्त्य जयस्वाल (Agastya Jaiswal) याने वयाच्या 14 व्या वर्षी, बीए मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझमची (BA Mass Communication and Journalism) पदवी मिळवली आहे. असे करणारा तो भारतातील पहिला विद्यार्थी ठरला आहे. स्वत: अगस्त्यने ही माहिती दिली आहे. हा विक्रम करून त्याने फक्त आपल्या पालकांचेच नाही तर राज्याचे नाव देखील उजळवले आहे. अगस्त्याने हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून बीए जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनची पदवी घेतली आहे. यापूर्वी वयाच्या 9 व्या वर्षी दहावीची परीक्षा देणारा तो पहिला विद्यार्थी ठरला होता.

वयाच्या 11 व्या वर्षी 63% गुणांसह इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण करून अगस्त्य तेलंगणचा पहिला विद्यार्थी ठरला होता. अगस्त्य जयस्वाल हा हैदराबाद येथील सेंट मेरी कॉलेज युसूफगुडाचा विद्यार्थी आहे. अभ्यासाशिवाय तो खेळातही प्रवीण आहे. तो राष्ट्रीय स्तरावर टेबल टेनिसही खेळतो. वयाच्या वयाच्या 9 व्या वर्षी 7.5 जीपीएसह 10 वीची परीक्षा उत्तीर्ण होणारा तेलंगणातील तो पहिला मुलगा होता. अगस्त्य जयस्वाल दोन वर्षांचा असताना 300 पेक्षा जास्त प्रश्नांची उत्तरे देत होता व तेव्हापासून त्याने पालकांच्या निरीक्षणाखाली प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. याबाबत तो म्हणतो, माझे पालकच माझे शिक्षक आहेत, त्यांच्या समर्थनामुळेच मी प्रत्येक आव्हानांचा सामना केला. (हेही वाचा: UAE च्या Dr Khawla AlRomaithi यांची कमाल; 87 तासांमध्ये केला 7 खंड व 208 देशांचा प्रवास, Guinness World Records मध्ये नोंद)

याशिवाय अगस्त्य 100 पर्यंतचे गुणाकार टेबल देखील सांगू शकतो. याखेरीज जयस्वाल दोन्ही हातांनी लिहू शकतो. तो एक मोटीव्हेशनल स्पीकर असून त्याला डॉक्टर व्हायचे आहे, म्हणून पुढे तो एमएमबीएसही करेल. अगस्त्य हा राष्ट्रीय स्तराचा टेबल टेनिसपटूही आहे. अनेक प्रतिभा लाभलेला अगस्त्य उत्तम गातो आणि पियानो वाजविण्यातही तो तरबेज आहे. त्याचे वडील अश्विनीकुमार जयस्वाल म्हणाले की, प्रत्येक मुलाची विशिष्ट गुणवत्ता असते, म्हणून पालकांनी आपल्या मुलांकडे योग्य लक्ष दिल्यास प्रत्येक मुलगा इतिहास घडवू शकतो.