Moody’s Rating On Adani Group: अदानी समूहावर जगातील मोठ्या रेटिंग एजन्सीनं दाखवला भरवसा
गेल्या वर्षी मूडीजने फेब्रुवारी 2023 मध्ये अदानी समूहाच्या काही कंपन्यांचे रेटिंग कमी केले आणि या कंपन्यांसाठी भांडवलाची उपलब्धता व खर्चात होणारी संभाव्य वाढ लक्षात घेऊन रेटिंग एजन्सीने हा निर्णय घेतला होता.
अदानी समुहाच्या शेअरमध्ये गुंतवणुक करणाऱ्या सकारात्मक बातमी आहे. जागतिक मानांकन संस्था मूडीज इन्व्हेस्टर्स ग्रुपने 13 फेब्रुवारीला सांगितले की, संस्थेने अदानी समुहाच्या चार कंपन्यांचा कर्जाचा दृष्टीकोन 'निगेटिव्ह' वरून 'स्टेबल' असा बदलला आहे. अदानी ग्रुपच्या ज्या कंपन्यांचे रेटिंग आउटलुक बदलले नाही त्यात अदानी ग्रीन एनर्जी रिस्ट्रिक्टेड ग्रुप (AGEL RG-2), अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड प्रतिबंधित ग्रुप 1 (AESL RG1), कंटेनर टर्मिनल प्रायव्हेट लिमिटेड, अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड आणि अदानी इंटरनॅशनल यांचा समावेश आहे. (आता अदानी समूह IRCTC ला देणार आव्हान, Gautam Adani रेल्वे क्षेत्रात ठेवणार पाऊल)
मुडीज कंपनीने सर्व कंपन्यांच्या रेटिंगला पुन्हा दुजोरा दिला असून ज्या कंपन्यांचे रेटिंग आउटलुक बदलले आहे त्यात 8अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड (AGEL), अदानी ग्रीन एनर्जी रिस्ट्रिक्टेड ग्रुप (AGEL RG-1), अदानी ट्रान्समिशन स्टेप-वन लिमिटेड (ATSOL) आणि अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (AEML) यांचा समावेश आहे.
मूडीजच्या या निर्णयाच्या काही आठवड्यांपूर्वी आणखी एक रेटिंग एजन्सी S&P ने अदानी पोर्ट्स आणि अदानी इलेक्ट्रिसिटीचे क्रेडिट आउटलुक 'निगेटिव्ह' वरून 'स्टेबल' केले होते. गेल्या वर्षी मूडीजने फेब्रुवारी 2023 मध्ये अदानी समूहाच्या काही कंपन्यांचे रेटिंग कमी केले आणि या कंपन्यांसाठी भांडवलाची उपलब्धता व खर्चात होणारी संभाव्य वाढ लक्षात घेऊन रेटिंग एजन्सीने हा निर्णय घेतला होता.