IPL Auction 2025 Live

Mithun Chakraborty:  अभिनेता मिथून चक्रवर्ती यांची कोलकाता पोलिसांकडून वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी चौकशी

ही तक्रार रद्द करावी यासाठी मिथून चक्रवर्ती यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने या प्रकरणाची व्हर्च्युअली चौकशी करण्याचे निर्देश दिले होते.

Mithun Chakraborty | (Photo Credits: YouTube)

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक (West Bengal Assembly Elections) प्रचारादरम्यान केलेल्या वादग्रस्त विधानासंदर्भात बॉलिवूड अभिनेता मिथून चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांची कोलकाता पोलीस चौकशी केली. मिथून चक्रवर्ती यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक तोंडावर असताना काहीच दिवस आगोदर भारतीय जतना पक्षात (BJP) प्रवेश केला होता. कोलकाता पोलीस (Kolkata Police) मिथून यांची व्हर्च्युअली चौकशी केली. मिथून चक्रवर्ती यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी मानिकलता पोलीस स्टेशन दप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही तक्रार रद्द करावी यासाठी मिथून चक्रवर्ती यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने या प्रकरणाची व्हर्च्युअली चौकशी करण्याचे निर्देश दिले होते.

मिथून चक्रवर्ती यांनी कोलकाता येथे भारतीय जनता पक्षात परवेश केला होता. भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेस पक्षावर तीव्र शब्दात टीकास्त्र सोडले होते. ब्रिगेड ग्राऊंट येथील एका रॅलीदरम्यान त्यांनी म्हटले होते की, 'मी एक नंबरचा कोबरा आहे. जर तुम्हाला डसलो तर तुम्ही फोटो बनाल'. या रॅलीमध्ये पंतप्रधान मोदी यांची वाट पाहणाऱ्या उपस्थितांसमोर केलेल्या भाषणात मिथून यांनी अनेक जोषपूर्ण पंचलाईन वापरत डायलॉगबाजी केली होती. त्यांनी म्हटले होते की, 'मला बंगाली असण्याचा गर्व आहे. मला माहिती आहे की तुम्हाला माझे डायलॉग आवडतात.' या वेळी त्यांनी आपल्या चित्रपटातील एका डायलॉगचाही वापर केला होता. (हेही वाचा, West Bengal Assembly Election 2021: 'डिस्को डान्सर कोबरा' पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक रिंगणाबाहेरच, मिथुन चक्रवर्ती यांना भाजप तिकीट नाहीच)

उल्लेखनीय असे की, मिथून चक्रवर्ती हे तृणमूल काँग्रेसच्या माध्यमातून राज्यसभा खासदारही राहिले आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळविण्यासाठी भाजपने जंग जंग पछाडले परंतू, तरीही भाजपला पश्चिम बंगालमध्ये यश मिळवता आले नाही. उलट स्पष्ट बहुमताने तृणमूल काँग्रेस सत्तेत कायम राहिली. भाजपचा मोठ्या प्रमाणावर पराभव झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या अनेक सभा होऊनही भाजपला येथे पराभव स्वीकारावा लागला.