Abortion in India: गर्भपातामुळे भारतात 2030 पर्यंत मुलींच्या संख्या 68 लाखाने होईल कमी; उत्तर प्रदेशात दिसून येईल सर्वात जास्त घट - Study
भारतात गर्भपातामुळे (Abortion) 2030 पर्यंत मुलींच्या जन्माच्या आकडेवारीत जवळपास 68 लाखांची घट होईल आणि सर्वाधिक घट उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) दिसून येईल. सौदी अरेबियाच्या किंग अब्दुल्ला युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (KAUST) आणि फ्रान्सच्या युनिव्हर्सिटी डी पॅरिसच्या संशोधकांनी एका अभ्यासानंतर हे सांगितले आहे.
भारतात गर्भपातामुळे (Abortion) 2030 पर्यंत मुलींच्या जन्माच्या आकडेवारीत जवळपास 68 लाखांची घट होईल आणि सर्वाधिक घट उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) दिसून येईल. सौदी अरेबियाच्या किंग अब्दुल्ला युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (KAUST) आणि फ्रान्सच्या युनिव्हर्सिटी डी पॅरिसच्या संशोधकांनी एका अभ्यासानंतर हे सांगितले आहे. या अभ्यासमध्येही असेही सांगितले आहे की, 1970 च्या दशकापासूनच जन्मपूर्व लिंग निवड होण्यास सुरवात झाली आणि पुरुष बाळांना पसंती देण्याच्या संस्कृतीमुळे भारतात जन्माच्या लिंग प्रमाणात (एसआरबी) असमतोल नोंदविण्यात आला आहे. येत्या काही वर्षांमध्ये गर्भपाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
संशोधकांनी असे म्हटले आहे की अशा असंतुलनांमुळे प्रभावित इतर देशांप्रमाणे भारतात लैंगिक प्रमाणातील असंतुलन प्रादेशिक विविधतेनुसार बदलते. 'PLOS ONE’ या जर्नलमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या संशोधनात, संशोधकांनी असे म्हटले आहे की, उत्तर प्रदेशात मुलींच्या जन्मामध्ये सर्वाधिक घट होणार आहे. 2017 ते 2030 पर्यंत अंदाजे दोन दशलक्ष कमी मुलींचा जन्म होईल. अभ्यासात म्हटले आहे की, 2017 ते 2030 पर्यंत संपूर्ण भारतभरात 68 लाख कमी मुली जन्माला येतील. (हेही वाचा: MTP: विवाहित, अविवाहित महिला आता 24 आठवड्यात करु शकणार गर्भपात; कायद्यात लवकरच होणार सुधारणा)
संशोधकांनी असे म्हटले आहे की, 2017 ते 2025 दरम्यान दर वर्षी सरासरी 4,69,000 कमी मुली जन्माला येतील. त्याच वेळी, 2026 ते 2030 दरम्यान ही संख्या दर वर्षी सुमारे 5,19,000 असेल. भारतात, 1994 मध्ये निवडक गर्भपात आणि जन्मपूर्व लैंगिक चाचणीवर बंदी घालण्यात आली होती. दुसरीकडे कोरोना व्हायरस काळात दिल्ली, पंजाब, तामिळनाडू, हरियाणा आणि मध्य प्रदेशात साठा नसल्याने, वैद्यकीय गर्भपाताच्या गोळ्यांची तीव्र कमतरता भासली आहे. फाउंडेशन फॉर रीप्रोडक्टिव्ह हेल्थ सर्व्हिसेसने 1500 औषध विक्रेते (केमिस्ट्स) वर केलेल्या अभ्यासात हे समोर आले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)