Abdul Karim Tunda: अब्दुल करीम टुंडा निर्दोष; टाडा न्यायालयाकडून 1993 च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुक्तता
राजस्थानमधील अजमेर येथील टाडा कोर्टाने (TADA Court) हा निर्णय गुरुवारी (29 फेब्रुवारी) रोजी दिला.
1993 Serial Bomb Blasts Case: टाडा (दहशतवादी आणि विघटनविरोधी क्रियाकलाप कायदा) न्यायालयाने 1993 च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी अब्दुल करीम टुंडा (Abdul Karim Tunda) याची पुराव्याअभावी गुरुवारी निर्दोष मुक्तता केली. राजस्थानमधील अजमेर येथील टाडा कोर्टाने (TADA Court) हा निर्णय गुरुवारी (29 फेब्रुवारी) रोजी दिला. या प्रकरणात अन्य दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली इरफान उर्फ पप्पू आणि हमिरुद्दीन अशी या दोघांची नावे आहेत. टुंडाच्या वकिलाने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) टाडा, आयपीसी, रेल्वे कायदे, शस्त्र कायदा किंवा स्फोटक पदार्थ कायदा यासह विविध कायद्यांमध्ये ठोस पुरावे प्रदान करण्यात अयशस्वी ठरले. त्यामुळे टुंडा याची निर्दोष मुक्तता होण्याचा मार्ग मोकळा झाला.
टुंडाच्या वकीलांची प्रतिक्रिया
वकील शफकत सुलतानी यांनी अब्दुल करीम टुंडा यांची बाचू न्यायालयात मांडली. त्यांनी टुंडाच्या सुटकेचे स्वागत केले आणि न्यायालयाचेही आभार मानले. वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना सुलतानी यांनी जोर देत सांगितले की, टाडा कोर्याने आज हा निकाल दिला. ज्यामध्ये कोर्टाने सांगितले की, अब्दुल करीम टुंडा निर्दोष आहे. सर्व आरोप आणि विविध गुन्ह्यांमध्ये लावलेली कलमे यांतून टुंडा यांचे नाव वगळण्यात आले आहे. त्यांच्यावरील आरोप आणि कथीत गुन्ह्यातील त्यांच्या सहभागाबद्दल सीबीआय संपूर्ण खटल्यात न्यायालयासमोर कोणताही ठोस पुरावा सादर करु शकले नाही. दरम्यान, निर्दोष मुक्त झाला तरी तो तुरुंगातून बाहेर येणार का? याबाबत मात्र त्याच्या वकीलांनी कोणतेही भाष्य केले नाही. (हेही वाचा, Supreme Court On Stay Order: सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; आता 6 महिन्यांनंतर न्यायालयाचा स्थगिती आदेश आपोआप रद्द होणार नाही!)
विविध बॉम्बस्फोट प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप
अब्दुल करीम टुंडा हा उत्तर प्रदेश राज्यातील गाझियाबाद जिल्ह्यातील पिलखुआ येथील रहिवासी आहे. विविध बॉम्बस्फोट प्रकरात त्याचे नाव आहे. बॉम्बस्फोटाच्या अनेक घटनांपैकी 1997 च्या रोहतक बॉम्बस्फोट प्रकरणात हरियाणातील एका ट्रायल कोर्टाने त्याला पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. सन 2013 मध्ये टुंडा याला भारत-नेपाळ सीमेजवळ पकडण्यात आले होते. त्याला लष्कर-ए-तैयबाचा बॉम्ब तज्ञ म्हणून ओळखले जाते. या आधी 1996 मध्ये झालेल्या सोनीपत बॉम्बस्फोट प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्याचे केवळ लष्कर ए तैय्यबाच नव्हे तर दाऊद इब्राहीम याच्याशीही संबंध असल्याचे बोलले जाते. प्रसारमाध्यमांतुनही याबातब अनेकदा वृत्त आले आहे. (हेही वाचा -Supreme Court: FIR ला विलंब होत असेल तर कोर्टाने सतर्क राहावे; सुप्रीम कोर्टाने का दिला 'असा' निर्णय? जाणून घ्या)
एक्स पोस्ट
दरम्यान, सध्या अजमेर तुरुंगात नजरकैदेत असलेला, टुंडावर इतर अनेक प्रकरणांमध्ये आरोप आहेत. त्यामुळे 1993 च्या मालिका बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष सुटल्यानंतरही त्याला प्रदीर्घ काळ तुरुगवासात रहावे लागू शकते.