Aatmanirbharta: Oxford Hindi word of the year 2020 म्हणून 'आत्मनिर्भरता' शब्दाची यंदा निवड

Oxford Hindi word of the year च्या यादीमध्ये यापूर्वी 2019 साली संविधान, 2018 साली नारी शक्ती, 2017 साली आधार हा शब्द पहायला मिळाला होता.

File image of PM Narendra Modi (Photo Credits: PIB)

कोरोना वायरस संकटकाळात भारताला पुन्हा आपल्या पायावर उभं करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आत्मनिर्भर भारत'(Aatmanirbhar Bharat)  चा नारा दिला. आता याच ' आत्मनिर्भरता' या शब्दाला ऑक्सफर्डा लॅग्वेजेसने Hindi Word of the Year 2020 चा बहुमान दिला आहे. Aatmanirbharta या शब्दामध्ये आत्म + निर्भरता त्याचा अर्थ दडला आहे. स्वयंपूर्ण व्हा आणि स्वतःच्या पायावर उभे रहा असा नारा यामधून देण्यात आला आहे. पंतप्रधानांनी त्याची सुरूवात केल्यानंतर आता समाजात अनेकांच्या ओठांवर हा शब्द आला आहे. दरम्यान advisory panel of language experts कृतिका अग्रवाल. पूनम निगम सहाय आणि Imogen Foxell यांनी या शब्दाची निवड केली आहे.

Oxford Hindi word of the year मध्ये असा शब्द निवडला जातो जो मागील वर्षभर जनसामान्यांमध्ये लोकप्रिय, प्रभाव टाकणारा असेल. तसेच त्यामध्ये सांस्कृतिक छाप असेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणामध्ये आत्मनिर्भरता या शब्दाचा उल्लेख आल्यानंतर हळूहळू त्याची लोकप्रियता वाढत गेली आहे. भारतामध्ये अनेक लहान -मोठ्या गोष्टींवर त्याचा प्रभाव जाणवू लागला आहे. याचं सर्वात मोठ यश हे भारताने कोविड 19 विरुद्ध लस निर्मिती करून दाखवण्यातही बघायला मिळते. राजपथावर यंदाच्या प्रजासत्ताक दिनी Department of Biotechnology च्या आत्मनिर्भर भारत कॅम्पेनमध्येही त्याची झलक पहायला मिळाली आहे.

Oxford Hindi word of the year च्या यादीमध्ये यापूर्वी 2019 साली संविधान, 2018 साली नारी शक्ती, 2017 साली आधार हा शब्द पहायला मिळाला होता.