गोव्याचे ऊर्जामंत्री Nilesh Cabral यांच्याशी Electricity Model वर चर्चा करण्यासाठी आप आमदार Raghav Chadha आज गोव्यात दाखल

गोव्याचे ऊर्जामंत्री निलेश काब्राल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरिवाल यांच्या इलेक्ट्रीसिटी मॉडलला आव्हान दिले होते. त्यानंतर आम आदमी पार्टीचे आमदार राघव चढा हे आज गोव्यात दाखल होणार आहेत.

Raghav Chadha (Photo Credits: ANI)

गोव्याचे ऊर्जामंत्री निलेश काब्राल (Goa Power Minister Nilesh Cabral) यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Goa Chief Minister Arvind Kejriwal) यांच्या इलेक्ट्रीसिटी मॉडलला (Electricity Model) आव्हान दिले होते. त्यानंतर आम आदमी पार्टीचे आमदार राघव चढा (AAP MLA Raghav Chadha) हे आज गोव्यात दाखल होणार आहेत. गोव्याचे ऊर्जामंत्री त्यांना चर्चेसाठी ठिकाण आणि वेळ कळवतील, अशी त्यांना आशा आहे. (Delhi Government New Guidelines: लग्न सोहळ्यात आता फक्त 50 जणांनाच उपस्थित राहता येणार; कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दिल्ली सरकारची नवी नियमावली जारी)

गोव्याच्या ऊर्जामंत्र्यांनी केजरीवाल यांच्या इलेक्ट्रिसिटी मॉडेलला आव्हान दिले आणि यावर पब्लिक डिबेट करण्याची इच्छा व्यक्त केली. हे आव्हान स्वीकारुन चढा आज गोव्यात दाखल होत आहेत.  "मी आज दुपारी गोव्यात येत असून डिबेटसाठी मला वेळ आणि जागा कळवावी, असे त्यांनी म्हटले आहे. तसंच गोव्याचे ऊर्जामंत्री येतील आणि डिबेटमध्ये सहभागी होतील अशी माझी अशी इच्छा आणि आशा आहे," असंही चढा एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.

भाजप हाय कमांडने गोव्याच्या लीडरशीपला फटकारलं असून अशा प्रकराच्या पब्लिक डिबेटमध्ये गुंतू नये, असे सांगण्यात आल्याचे आपच्या आमदारांचे म्हणणे आहे. या डिबेटमधून फक्त गोव्यातील नागरिकांचा फायदा होणार आहे, याचीही गोव्याच्या ऊर्जामंत्र्यांनी नोंद घ्यावी, असंही सूचित करण्यात आलं आहे.

सोमवारी चढा यांनी दिल्ली आणि गोव्याच्या इलेस्ट्रिसिटी मॉडेलवर डिबेट करण्याचे आव्हान केले होते. यावर उत्तर देताना  गोवा ऊर्जामंत्री निलेश काब्राल म्हणाले की, "गोवा आणि दिल्लीमधील ऊर्जेचा प्रश्न समजणाऱ्या व्यक्तींसोबत वादविवाद करण्यात मला कोणतीही समस्या नाही. परंतु, ज्या व्यक्ती याच्याशी निगडीत नाहीत, त्यांच्याशी वादविवाद करण्यात मला रस नाही. मी दिल्लीच्या ऊर्जामंत्र्यांना वादविवाद करण्यासाठी आमंत्रण करत आहे. हे केवळ आमंत्रण आहे मी कोणालाही आव्हान देत नाही."

गोव्याचे मुख्यमंत्री अरविंद सावंत यांच्याबद्दल केलेल्या एका ट्विटवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर हा वाद सुरु झाला. या ट्विटमध्ये असे म्हटले होते की, "दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत होणाऱ्या प्रदुषणाविषयी काळजी करावी. त्यांनी गोव्याची चिंता करु नये."

गोव्यामध्ये सत्ता असलेल्या भाजप आणि अरविंद केजरीवाल यांच्या आपमध्ये पर्यावरणीय समस्यांच्या मुद्द्यांवरुन गेल्या अनेक काळापासून वादविवाद सुरु आहेत. संरक्षित वनक्षेत्रातून रेल्वेचा डबल ट्रॅकिंग प्रोजेक्ट हे या वादविवादाचे सर्वात मुख्य कारण आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now