दिल्लीतील AAP चे नेते संजय सिंग यांनी लिहिले असे ट्विट ज्यावर प्रत्येक मराठी माणसाला होईल गर्व

दिल्लीचे आप चे नेते संजय सिंग (Sanjay Singh) यांनी मराठ्यांचे कौतुक करत महाराष्ट्रातील राजकारणात घडलेल्या या ऐतिहासिक बदलाचे स्वागत केले आहे.

Sanjay Singh (Photo Credits: Wikimedia)

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा तिढा सुटायचे नाव घेत नव्हती मात्र सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयानंतर सर्व राजकीय वातावरणात वा-याच्या वेगाने सूत्रं हलू लागली आणि अखेर महाविकासआघाडीचा विजय होत सर्वाधिक कमी कालावधी असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नेस्तनाभूत करुन टाकले. हा महाराष्ट्रातील जनतेचा विजय आहे सांगून सर्वत्र जल्लोषाचे आणि आनंदाचे वातावरण पसरले आहे. तसेच उद्याचा दिवस हा महाविकासआघाडीच्या सत्तास्थापनेचे असू शकते असेही म्हणता येईल. यामुळे सर्वच स्तरातून शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचे कौतुक केले जात आहे. त्यात दिल्लीतून आपच्या नेत्याने हटके स्टाईल मध्ये ट्विट करत महाराष्ट्रातील या मोठ्या घडामोडीचे कौतुक केले आहे.

दिल्लीचे आप चे नेते संजय सिंग (Sanjay Singh) यांनी मराठ्यांचे कौतुक करत महाराष्ट्रातील राजकारणात घडलेल्या या ऐतिहासिक बदलाचे स्वागत केले आहे.

पाहा संजय सिंग यांचे ट्विट:

प्रत्येक मराठी माणसाची छाती अभिमानाने फुलून येईल असे ही ट्विट असून त्यात दिल्लीच्या सरकारापुढे मराठा कधीही झुकणार नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. हेदेखील वाचा- केवळ 80 तासांत कोसळले देवेंद्र फडणवीस यांचे सरकार; सर्वाधिक कमी काळ पदावर असलेले ठरले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस (Shiv Sena-Nationalist Congress-Congress) या महाविकासआघाडी सरकारमध्ये एक मुख्यमंत्री (Chief Minister) तर दोन उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) असणार आहेत. या सरकारमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे मख्यमंत्री तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयंत पाटील (Jayant Patil,) आणि काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हे उपमुख्यमंत्री म्हणून कारभार पाहणार आहेत. उद्धव ठाकरे यांचा मुख्यंमत्री म्हणून शपतविधी उद्या (बुधवार, 27 नोव्हेंबर 2019) पारपडणार आहे, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.