Aadhar-Pan Card लिंक करण्यासाठी 31 डिसेंबर 2019 पर्यंत मुदतवाढ
आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याच्या मुदतीत वाढ करून आता शेवटची तारीख ही 31 डिसेंबर 2019 करण्यात आल्याचे समजत आहे. अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून याबाबत एका पत्रकाच्या मार्फत माहिती देण्यात आली आहे.
आधार कार्ड (Aadhar Card) आणि पॅन कार्ड (Pan Card) लिंक करण्याच्या मुदतीत वाढ करून आता शेवटची तारीख ही 31 डिसेंबर 2019 करण्यात आल्याचे समजत आहे. अर्थ मंत्रालयाच्या (Ministry Of Finance) अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून (Central Board Of Direct Tax) याबाबत एका पत्रकाच्या मार्फत माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत 30 सप्टेंबर पर्यंत ठेवण्यात आली होती, मात्र आता मुदतवाढ केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. अशा प्रकारची मुदतवाढ करण्याची ही सातवी वेळ आहे.
प्राप्त माहितीनुसार, CBDT तर्फे सुरवातीला देण्यात आलेल्या सूचनेत 30 सप्टेंबर पर्यंत १२ अंकी आधार कार्ड क्रमांक व 10 अंकी पॅन कार्ड क्रमांक लिंक करण्यास सांगितले होते, यातून आयकर भरण्याच्या प्रक्रियेत आणखीन सहजता येईल असे अपेक्षित आहे. याआधी सुद्धा 31 मार्च 2019 रोजी आधार- पॅन कार्ड लिंक करण्याची तारीख सहा महिने पुढे ढकलण्यात आली होती त्यानंतर आता पुन्हा डिसेंबर पर्यंत मुदतवाढ करून देण्यात आला आहे. अशाप्रकारची मुदतवाढ करण्याची ही सातवी वेळ आहे.आधार कार्डवरील 'या' गोष्टींबाबत अपडेटसाठी आता कागदपत्रांची गरज भासणार नाही
ANI ट्विट
कसे कराल आधार पॅन लिंक
-आयकर विभागाच्या e-Filing Website www.incometaxindiaefiling.gov.in या संकेतस्थळावर जावे
-डाव्या बाजूला Link Aadhar ऑप्शनवर क्लिक करून तुमचा पॅन, आधार कार्ड क्रमांक आणि आधार कार्डवरील नाव लिहा
-'I Have Only Year Of Birth In Aadhaar Card' या ऑप्शनवर क्लिक करा.
-नाव आणि अन्य माहिती दिल्यावर एक ओटीपी किंवा कॅप्चा कोड दाखवला जाईल
-तुमच्या मोबाईलवर आलेल्या ओटीपी पोस्ट करत Link Aadhar या ऑप्शनवर क्लिक करताच आधार- पॅन लिंक होईल
दरम्यान, आयकर विभागाकडून आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे. डिसेंबर पर्यंत आधार- पॅन लिंक न केल्यास वापरकर्त्यांचे पॅन कार्ड निष्क्रिय करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)