IPL Auction 2025 Live

Aadhar Enabled Payment System Fraud: आधारच्या माध्यमातून केले 10 लाखांचे बनावट व्यवहार; पोलिसांकडून 6 जणांच्या टोळीला अटक

आता या टोळीला हैदराबाद सायबर क्राईम पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

arrest (संग्रहित संपादित प्रतिमा)

हैदराबाद सायबर क्राइम पोलिसांनी 10 लाख रुपयांचे फसवे व्यवहार करणाऱ्या 6 जणांच्या टोळीला अटक केली आहे. याबाबत माहिती देताना पोलीस सहआयुक्त गजाराव भूपाळ यांनी सांगितले की, या टोळीने आधार सक्षम पेमेंट सिस्टम (AEPS) चा गैरवापर करून अनेक फसवे व्यवहार केले. आता या टोळीला हैदराबाद सायबर क्राईम पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आधार सक्षम पेमेंट सिस्टम ही अशी प्रणाली आहे, ज्याचा वापर पिन नंबर किंवा मोबाइल डिव्हाइस शिवाय लहान व्यवहार करण्यासाठी केला जाऊ शकतो. (हेही वाचा: ED Action Against Amway India: अॅमवे इंडियाने फसवणूक करून कमावले 4000 कोटी रुपये, देशाबाहेरील खात्यांवर पाठवले पैसे; ED ने दाखल केले आरोपपत्र)