Tatkal Train Tickets बुकिंग साठी आता आधार लिंक करणं अनिवार्य - IRCTC चा नवा नियम
आयआरसीटीसीने ऑनलाइन तिकिटे बुक करण्यासाठी AI टूल्सच्या वापराविरुद्ध मोहीम सुरू केली आहे, असे आयआरसीटीसीच्या अजून एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.
इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने Tatkal Quota मध्ये रेल्वे तिकिटे बुक करण्यासाठी प्रवाशांना त्यांचा आधार नंबर त्यांच्या लॉगिन आयडीशी लिंक करणे अनिवार्य केले आहे. या आठवड्यापासून अंमलात आणण्यात येणारी ही कारवाई, दलालांना अनेक तात्काळ तिकिटे बुक करण्यापासून रोखण्यासाठी आणि तात्काळ तिकिटांमध्ये खऱ्या प्रवाशांना प्रथम प्राधान्य मिळावे याची खात्री करण्यासाठी आहे, असे IRCTC अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
सध्या, IRCTC प्लॅटफॉर्मवर 130 दशलक्षाहून अधिक अॅक्टिव्ह युजर्स आहेत, त्यापैकी फक्त 1.2 कोटी खाती आधार व्हेरिफाईड आहेत. ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे दररोज सुमारे 2 लाख 25 हजार तात्काळ तिकिटे बुक केली जातात, त्यापैकी 66.4% तिकिटे तात्काळ बुकिंग सुरू झाल्यानंतर पहिल्या 10 मिनिटांत विकली जातात. तात्काळ बुकिंग सुरू झाल्यानंतर पहिल्या तासात सुमारे 84.02 % तात्काळ तिकिटे विकली जातात, तर 12% तात्काळ तिकिटे विंडो उघडल्यानंतर 8-10 तासांत बुक केली जातात.
आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आधार-व्हेरिफाईड युजर्सना तत्काळ तिकिटांसाठी प्राधान्यक्रमाने प्रवेश मिळेल, विशेषतः महत्त्वाच्या पहिल्या 10 मिनिटांत त्यांना तिकीट मिळू शकते. "या सुरुवातीच्या टप्प्यात अधिकृत आयआरसीटीसी एजंटनाही अनेक युजर आयडी आणि ईमेल असले तरीही ते तत्काळ तिकिटे बुक करू शकणार नाहीत." असे आयआरटीसीच्या एका अधिकाऱ्याने हिंदुस्तान टाईम्सला सांगितले.
तत्काळ तिकिटे बुक करण्यासाठी आधार-बेस्ड वन-टाइम पासवर्ड देखील आवश्यक असणार आहे. भविष्यात, काउंटरवरून तत्काळ तिकिटे बुक करण्यासाठी देखील आधार पडताळणी अनिवार्य केली जाणार आहे.
दरम्यान, आयआरसीटीसीने ऑनलाइन तिकिटे बुक करण्यासाठी AI टूल्सच्या वापराविरुद्ध मोहीम सुरू केली आहे, असे आयआरसीटीसीच्या अजून एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jun 06, 2025 12:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

