काय सांगता! वयाच्या 65 व्या वर्षी महिलेने दिला कुत्र्याला जन्म; वृद्ध महिलेचा दावा ऐकून गावकरी थक्क, जाणून घ्या सविस्तर (Watch Video)

यानंतर महिलेच्या घरी लोकांची गर्दी जमू लागली, आता या प्रकरणात किती तथ्य आहे, हे प्रशासकीय तपासणीनंतरच कळेल.

महिलेने दिला कुत्र्याला जन्म (संग्रहित संपादित प्रतिमा)

जगात अशा काही विचित्र गोष्टी आहेत ज्यांवर विश्वास ठेवणे खूप कठीण आहे. आताही अशीच एक बातमी समोर आली आहे, जी ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. होय, आपल्या सर्वांना माहित आहे की सामान्यतः मनुष्याचा जन्म एका मनुष्याच्या पोटातून आणि प्राण्याचा जन्म एका प्राण्याच्या पोटातून होतो, परंतु आता एका महिलेने दावा केला आहे की तिने चक्क कुत्र्याला जन्म दिला आहे. यूपीमधील बदायूंमधून (Badaun) हे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

येथे राहणाऱ्या 65 वर्षीय महिलेने म्हटले आहे की, तिने कुत्र्याच्या बाळाला जन्म दिला आहे. महिलेच्या या दाव्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. मात्र, डॉक्टरांच्या मते ही पूर्णपणे अंधश्रद्धा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिलेने दावा केला आहे की कुत्र्याच्या बाळाच्या जन्मापूर्वी भैरव बाबा तिच्या स्वप्नात आले होते, त्यांनी सांगितले होते की ते तिच्या पोटातून कुत्र्याच्या मुलाच्या रूपात जन्म घेतील.

या महिलेला आधीच तीन मुली असून त्या सर्वांची लग्ने झाल्याचे सांगण्यात येत आहे. महिलेचे म्हणणे आहे की, तिच्या पोटात 17 वर्षांपासून एक गाठ होती. एके दिवशी ती झोपेत असताना भैरव बाबा तिच्या स्वप्नात आले आणि त्यांनी तिला सांगितले की, ते तिच्या पाटातून एका कुत्र्याच्या रूपाने जन्म घेतील. महिला आणि तिच्या पतीचा दावा आहे की, 7 नोव्हेंबरला महिलेने एका पिल्लाला जन्म दिला.

(हेही वाचा: निवडणुकीचे तिकीट नाकारल्याने आप नेते Haseeb-ul-Hasan चढले टॉवरवर; पक्षावर केले गंभीर आरोप)

महिलेच्या पोटातून पिल्लाचा जन्म झाल्याचे पाहून सर्वसामान्यांनाच नाही तर पशुवैद्यकांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. यानंतर महिलेच्या घरी लोकांची गर्दी जमू लागली, आता या प्रकरणात किती तथ्य आहे, हे प्रशासकीय तपासणीनंतरच कळेल. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये एक कुत्रा महिलेच्या मांडीवर बसलेला दिसत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif