Viral Video: भररस्त्यात तीन अल्पवयीन मुलांचा धोकादायक स्केटींग स्टंट, व्हायरल व्हिडिओवर नेटकरी संतापले
सोशल मीडियावर ट्रेंड बनवण्यासाठी आता लहान मुलं देखील मागे राहिली नाहीत. इन्स्टाग्रामवर एक रिल्स व्हायरल होत आहे. ज्यात अल्पवयीन मुले रस्त्यावर धोकादायक स्टंट करत आहे.
Viral Video: प्रसिध्द मिळवण्यासाठी तरुण मंडळी कोणत्याही टोकाला जाऊन व्हिडिओ शूट करतात. सोशल मीडियावर ट्रेंड बनवण्यासाठी आता लहान मुलं देखील मागे राहिली नाहीत. इन्स्टाग्रामवर एक रिल्स व्हायरल होत आहे. ज्यात अल्पवयीन मुले रस्त्यावर धोकादायक स्टंट करत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला. जीव धोक्यात घालून स्टंट करत असल्याचे दिसत आहे. हेही वाचा- विशाखापट्टणममधील बँक ऑफ बडोदामध्ये सापडला साप, व्यक्तीने हाताने पकडला पाहून,कर्मचाऱ्यांना धक्का बसला (पहा व्हिडिओ)
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील गाझियाबादचा असल्याचा दावा केला जात आहे. तीन मुले रस्त्यात धोकादायक स्टंट करत आहे. तीन मुले रस्त्यावर स्केटींग करताना दिसत आहे. तीन मुले एका भरधाव ऑटो रिक्षाच्या मागे स्केटींग करत आहे. ते स्टंट करत असताना रिक्षाला देखील पकडत आहे. हा धोकादायक स्टंट मुले रिल्स बनवण्यासाठी करत असल्याचे समोर आले आहे. आपल्या मुलांना भररस्त्यात स्टंट स्टंट करू दिल्याबद्दल या मुलांवर आणि त्यांच्या पालकांवरही कठोर कारवाई करावी अशी नेटकऱ्यांनी विनंती केली आहे.
पहा व्हिडिओ
या व्हिडिओमुळे अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. परिस्थिती केवळ मुलांसाठीच नाही तर रस्त्यावरील इतर वाहनचालकांसाठीही अत्यंत धोकादायक आहे. जर एखादे वाहन मागून वेगात आले तर धडकेने गंभीर दुखापत होऊ शकते किंवा प्राणहानीही होऊ शकते. रस्त्यावर हा धोकादायक स्टंट करणं कितपत योग्य आहे असा प्रश्न विचारण्यात आला आहे.