दिल्ली: मोतीनगर येथील रोड शो दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या श्रीमुखात भडकवली (Video)
लोकसभा निवडणूक 2019 च्या प्रचारासाठी मोतीनगर भागात रोड शो करत असताना एका अज्ञात व्यक्तीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कानशिलात लगावली आहे.
लोकसभा निवडणूक 2019 (Loksabha Elections 2019) च्या प्रचारासाठी दिल्लीतील (Delhi) मोतीनगर (Moti Nagar) भागात रोड शो (Roadshow) करत असताना एका अज्ञात व्यक्तीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi Chief Minister Arvind Kejriwal) यांच्या कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. रोड शो दरम्यान जमाव केजरीवाल यांच्या नावाचा जयघोष करत असताना एक युवक थेट जीपवर चढला आणि त्याने जीपमध्ये उभ्या असलेल्या केजरीवाल यांच्या श्रीमुखात भडकवली.
ANI ट्विट:
पहा व्हिडिओ:
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अरविंद केजरीवाल यांना कानशिलात लगावणाऱ्या व्यक्तीचे नाव सुरेश असून तो दिल्लीच्या कैलाश पार्क येथील रहिवासी आहे. केजरीवाल यांच्यावर नाराज असल्याने त्याने हे पाऊल उचलले. यापूर्वी देखील 2014 मध्ये केजरीवाल यांना एका ऑटो ड्रायव्हरने कानशिलात लगावली होती.
यापूर्वी काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांना भर प्रचारसभेत कानशिलात लगावण्याचा प्रकार घडला होता. या घटनेचाही व्हिडिओ समोर आला होता. पाटीदार आरक्षण आंदोलन सुरु असताना पत्नी प्रेग्नेंट असल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागल्याने या व्यक्तीने हार्दिक पटेल यांच्यावरील राग कानशिलात लगावून व्यक्त केला होता.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)