Love Story: मास्तरीनबाईंनी विद्यार्थीनीशीच केले लग्न, लिंगाचेही विघ्न केले दूर; नवदाम्पत्य सुखात, घ्या जाणून
राजस्थान (Rajasthan) राज्यातील महिला शिक्षक आणि विद्यार्थीनी यांच्यातील विवाहाची सध्या राज्यभर चर्चा सुरु आहे. या लग्नासाठी शिक्षिकेने चक्क आपले लिंग बदल (Gender Change) केले. भरतपूरमध्ये (Bharatpur ) एका महिला शिक्षिकेने लिंग बदलून आपल्या विद्यार्थिनीशी लग्न केले आहे
राजस्थान (Rajasthan) राज्यातील महिला शिक्षक आणि विद्यार्थीनी यांच्यातील विवाहाची सध्या राज्यभर चर्चा सुरु आहे. या लग्नासाठी भरतपूर (Bharatpur ) येथील एका महिला शिक्षिकेने लिंग बदल शस्त्रक्रिया (Gender Change) करुन आपल्या विद्यार्थिनीशी लग्न केले आहे. महिला शिक्षिकेचे नाव मीरा तर विद्यार्थिनीचे नाव कल्पना असे आहे. डीग (Deeg) येथील रहिवासी असलेल्या मीरा या नागला (Government Secondary School, Nagla) येथील शासकीय माध्यमिक विद्यालयात शारीरिक शिक्षण शिक्षिका (Physical Education Teache) म्हणून कार्यरत आहेत. तिची विद्यार्थिनी कल्पना याच शाळेत शिकत होती.
महिला शिक्षक आणि विद्यार्थीनीच्या या विवाहाची राष्ट्रीय प्रसारमाध्यमांनीही दखल घेतली आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला शिक्षक आणि विद्यार्थीनी एकमेकींना शाळेत भेटल्या. त्यांच्या भेटी वाढत गेल्या या भेटीतून मैत्री आणि पुढे प्रेमही वाढत गेले. अखेर दोघींनी विवाह करण्याचे ठरवले. (हेही वाचा, Same Sex Marriage: 'भारतात केवळ जैविक पुरुष आणि जैविक स्त्री यांच्यातीलच विवाहाला परवानगी, समलिंगी विवाह मान्य नाही'- केंद्र)
लग्न करण्याचा त्यांचा निश्चय पक्का होता. परंतू, समान लिंगामुळे त्यांना अडचणी येत होत्या. अखेर शिक्षिका मिरा यांनी स्वत:वर लिंगबदल शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले. 2019 मध्ये, मीराने लिंग बदलासाठी जाण्याचा निर्णय घेतला. अनेक वेळा नोंदणी केल्यानंतर, शेवटी तिने तिचे लिंग बदलले आणि 4 नोव्हेंबर 2022 रोजी दोघांनी लग्न केले.
मीराला आता आरव या नावाने ओळखले जाते. या लग्नामुळे नवदाम्पत्य आनंदी आहे.चार बहिणींमध्ये मीरा सर्वात लहान होती. वधू असलेली कल्पना एक सक्षम क्रीडापटू आहे. ती इयत्ता 11 वी-12 वी मध्ये राज्य स्तरावर खेळली आहे आणि 2021 मध्ये तिच्या पदवीच्या दरम्यान राष्ट्रीय पातळीवरही तिने लक्षवेधी कामगिरी केली आहे. जानेवारीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रो-कबड्डीमध्ये सहभागी होण्यासाठी कल्पना आता दुबईला जाणार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)