कोरोना काळात सेवाकार्य करणाऱ्या 18 सेवाभावी संस्थांचा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते सत्कार; 9 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे सह देशापरदेशातील ठळक घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
कोरोना काळात सेवाकार्य करणाऱ्या 18 सेवाभावी संस्थांचा राज्यपाल भगत सिंह यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. लोढा फाऊंडेशनमार्फत सत्काराचे आयोजन करण्या आले. गोरगरीब व दीनदुबळ्यांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा. सर्वांनी करुणा जागविल्यास कोरोना संकटावर धैर्याने मात करता येईल अशी भावना राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केली.
पंजाब पोलिसांनी माहिती दिली आहे की, पंजबा राज्यात 38 Facebook, 49 Twitter आणि 21 YouTube चॅनलवर बंदी घालण्यात आली आहे. ही या खात्यांवरुन हिंसाचार, दिशाभूल अशा गोष्टींना प्रोत्साहन देण्यात येत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे पंजाब पोलिसांनी म्हटले आहे.
आज मुंबई शहरामध्ये 2,227 रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये रुग्णांथी दुहेरी नोंद व मुंबई बाहेरील रूग्णांच्या रिकंसीलेशन नंतर आजची बाधित रुग्णांची संख्या कमी होऊ शकते. यासह एकूण संक्रमितांची संख्या 1,60,774 वर पोहोचली आहे. रिकंसीलेशन नुसार 239 बाधित रुग्ण दुहेरी नोंद असल्यामुळे प्रगतीपर अहवालातून कमी करण्यात आले आहेत. आज शहरामध्ये 839 कोरोनाचे रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत 1,26,745 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या मुंबईमध्ये कोरोना विषाणूच्या 25,659 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज शहरामध्ये 43 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत 7,982 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 23,816 रुग्णांची नोंद झाली आहे. आज राज्यात 13,906 रुग्णांना बरे झाल्यांनतर सोडण्यात आले असून, 325 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह महाराष्ट्रामधील एकूण कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 9,67,349 वर पोहोचली आहे. आतापर्यंत एकूण 6,86,462 रुग्ण बरे झाले आहेत व सध्या 2,52,734 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना पुढे येत आहे. ही घटना आटपाडी शहर परिसरात घडली. बबन बेरड काळे, रवी बेरड काळे, बबलू पपलू शिंदे अशी आरोपींची नावे आहेत. धक्कादायक म्हणजे आरोपींना पीडित मुलीच्या चुलतीनेच सहकार्य केल्याचा आरोप आहे. सर्व आरोपी मूळचे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील हाजापूर गावचे रहिवासी आहेत. पीडितेस आणि तिच्या चुलत्यास दाद न देणाऱ्या पोलिसांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांच्या आदेशावरुन आटपाडी पोलीस स्टेशन दप्तरी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
उद्या सकाळी 10 वाजता अम्बाला येथील एअरफोर्स स्टेशनवर राफेल विमानांना औपचारिकपणे भारतीय हवाई दलात दाखल केले जाईल. हे विमान 17 स्क्वॉड्रॉन, “गोल्डन एरो” चा भाग असेल. राफेल विमान हे दोन दशकांहून अधिक काळातील लढाऊ विमानांचे भारतातील पहिले मोठे अधिग्रहण आहे: संरक्षणमंत्री
कंगना रनौंत हिने कश्मिरी पंडीतांवर चित्रपट बनविणार असल्याचे एका व्हिडिओत म्हटले. त्यानंतर 'शिकारा' या चित्रपटाचे लेखक राहुल पंडीत यांनी सुनावले आहे. पंडीत यांनी म्हटले आहे की, केवळ चित्रपट बनवून काश्मिरी पंडितांचे दु:ख समजू शकत नाही.
भारत आणि चीनमध्ये आज सकाळी 11 ते दुपारी 3 या दरम्यान चुशूल येथे ब्रिगेड कमांडर स्तरीय चर्चा झाली. दोन्ही बाजूंनी कॉर्पस कमांडर स्तरावरील चर्चेसंदर्भात व्यापकपणे सहमती दर्शविली आहे. मात्र त्यासाठी तारीख, कार्यपद्धती व अजेंडा निश्चित होणे बाकी आहे. भारतीय लष्कराचे सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्यासाठी शरद पवार मुंबईतील वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. सोबत राज्यमंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब देखील उपस्थित आहेत.
कंगनाच्या कार्यालयाबद्दल माझ्याकडे कोणतीही माहिती नाही. मी वर्तमानपत्रात वाचले की ते अनधिकृत बांधकाम आहे. मात्र, मुंबईत अनधिकृत बांधकामे नवीन नाहीत. जर बीएमसी नियमांनुसार वागत असेल तर ते बरोबर आहे. असे राष्ट्रवादी कॉंग्रसेचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.
दिल्ली विधानसभेचे एक दिवसीय अधिवेश 14 सप्टेंबर रोजी पार पडणार असून दुपारी 2 वाजता बैठक सुरु होईल. सर्व सदस्यांना मास्क घालणे बंधनकारक असल्याचे विधानसभा सचिवालयाकडून सांगण्यात आले आहे.
उत्तर प्रदेश: 6,711 नवे कोरोना बाधित रुग्ण तर 66 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण 64,028 अॅक्टीव्ह रुग्ण असून 2,16,901 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 4,112 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
मुंबईची पाकव्याप्त कश्मीर सोबत तुलना केल्यानंतर तसेच माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची भीती वाटते असं मत जाहीर केल्यानंतर शिवसेना, सामान्य मुंबईकरांच्या रोषाला सामोरी जाणारी कंगना आज मुंबईमध्ये दाखल होणार आहे. तिची मनालीमध्ये करण्यात आलेली कोरोना चाचणी निगेटीव्ह आहे. आज कंगना मुंबईमध्ये दाखल होणार आहे. दरम्यान मुंबईमध्ये उतरल्यानंतर स्थिती कशी असेल हे पाहणं आता उत्सुकतेचं आहे. दरम्यान कुणाच्या बापाची हिंम्मत आहे. त्याने मला मुंबईमध्ये अडवून दाखवा असं खुलं आव्हान दिलं होतं.
नाशिक जिल्हा आज पुन्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरला आहे. सलग दुसर्या दिवशी नाशिक मध्ये 3.2रिश्टल स्केलचा भूकंप नाशिकच्या पश्चिमेला 93 किमी चा होता. हा सौम्य भूकंप सकाळी 4 वाजून 17 मिनिटांनी बसला होता.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दिल्लीमध्ये आज ब्लू आणि पिंक अशा दोन्ही मेट्रोच्या सेवेला आजपासून सुरूवात झाली आहे. प्रवासी ही वाहतूक सेवा पुन्हा सुरू झाल्याने आनंदामध्ये आहे. दरम्यान भारतामध्ये प्रत्येक दिवशी मोठ्या संख्येने रूग्ण समोर येत असल्याने पुन्हा नागरिक धास्तावले आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)