महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वांना घरूनच शुभेच्छा देण्याचे केले आवाहन; 9 जानेवारी 2021 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
भंडारा जिल्ह्यासाठी शनिवारची पाहाट काळरात्र ठरली. रात्रीच्या नीरव अंधारात सर्व काही निद्राधीन असताना काळाने घाला घातला. भंडारा जिल्हा रुग्णालयातील शिशु केअर युनिटला आग लागली. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेत 10 बालकांचा मृत्यू झाला. रात्री दोन वाजनेच्या सुमारास ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 11 जानेवारी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला शुभेच्छा देण्यासाठी गर्दी करणे व कोरोना नियमाचे उल्लंघन करणे योग्य होणार नाही. सध्या राज्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेणे ही आपली मोठी जबाबदारी आहे. तेव्हा आपणास माझी नम्र विनंती आहे की, आपण प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा आपले प्रेम व सद्भावना अशीच कायम ठेवाव्यात. यामुळे मला आरोग्यदायी राज्य घडविण्यासाठी बळ आणि प्रेरणा मिळेल, असे राजेश टोपे म्हणाले आहेत. ट्विट-
जम्मू-काश्मीर मध्ये मिनी बसचालकाचा बसवरील नियंत्रण सुटल्याने बसचा अपघात झाला. या अपघातात 10 पर्यटक जखमी झाले आहे. जखमींना जवळील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जळीत प्रकरणातील बालकांच्या मृत्यूच्या घटनेच्या चौकशीसाठी आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती गठीत करण्यात आली असून ही समिती शासनाला तीन दिवसात अहवाल सादर करेल, असे आरोग्यमंत्रीनी आज सांगितले आहे. ट्विट-
फायर सेफ्टीची कुठलीही व्यवस्था नाही. यासाठीचा प्रस्ताव मे महिन्यात आरोग्य सेवा सहसंचालक आणि पुढे मंत्रालयापर्यंत पोहोचलेला. पण, त्यावर कुठलाही निर्णय नाही. त्यावर वेळीच निर्णय झाले असते, तर आज या बालकांना प्राण गमवावे लागले नसते, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. ट्वीट-
आंध्र प्रदेश येथे आज 199 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर, एका मृत्युची नोंद झाली आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्या 8 लाख 84 हजार 689 वर पोहचली आहे. ट्विट-
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन म्हणाले की कोरोनाव्हायरस लसीकरण लवकरच सुरू होईल आणि जगाला “कमी खर्चात, सुरक्षित आणि प्रभावी” लस बनवण्याच्या दिशेने काम केले जाईल.
भंडारा येथील जिल्हा रुग्णालय आग प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. चौकशी अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राजेश टोपे यांनी भंडारा जिल्हा रुग्णालायला भेट दिली. त्यानंतर ते बोलत होते.
मुंबई शहरासाठी दोन आयुक्त असायला पाहिजेत अशी मागणी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केली आहे. मुंबई शहराचा आवाका पाहता त्यासाठी एक आयुक्त अपूरे पडत आहेत. त्यामुळे दोन आयुक्तांची आवश्यकता असल्याचे अस्लम शेख यांनी म्हटले आहे.
गोवा, रायगड, सिंधुदुर्ग भागात वादळी पावसाची शक्यता आहे. पुढी 2 ते 3 तासांमध्ये सावंतवाडी, दूर्ग परिसरात पाऊक कोसळू शकतो, असा अंदाज के एस होसाळीकर, क्षेत्रीय हवामान केंद्र, मुंबई यांनी व्यक्त केला आहे.
कोवॅक्सीनचे पूर्ण परिणाम समोर यईपर्यंत आपण थांबायला हवे. ही आंतरराष्ट्रीय महामारीआहे. त्यामुळे अपत्तालिन स्थितीतही केंद्र सरकार कोवॅक्सीन उपलब्ध करु इच्छित असल्याचे छत्तीसगडचे आरोग्यमंत्री टी. एस. सिंह देव यांनी म्हटले आहे.
शेतकरी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी कॉंग्रेस 15 जानेवारी रोजी देशभरातील सर्व राज्यपाल सभागृहांबाहेर निषेध करणार आहेत, अशी माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे.
कोविड लसीकरणानंतरचे परिणाम एखाद्या व्यक्तीमध्ये 30 मिनिटांत दिसून येतात. 24 ते 48 तासाच्या लसीकरणानंतरचे कोणतेही दुष्परिणाम दिसले नाहीत, असे मध्य प्रदेशचे आरोग्यमंत्री प्रभु राम चौधरी यांनी म्हटले आहे. ते कोरोना लस घेतल्यावर एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर बोलत होते.
लॉकडाऊन काळात सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्यात आलेली मुंबई रेल्वे लवकरच सुरु केली जाणार आहे. हा निर्णय येत्या मंगळारपर्यंत याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी मुंबई उच्च न्यायालयात शुक्रवारी दिली. त्यामुळे मुंबई करांना दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने हा निर्णय लवकर जाहीर केल्यास अत्यावश्यक सेवेत नसलेल्या नागरिकांनाही मुंबई लोकलने प्रवास करता येणार आहे.
केंद्र सरकारने पारीत केलेल्या शेती कायद्याला देशभरातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे दिल्लीच्या सीमेवर शेतकरी मोठ्या प्रमाणावर आंदोलन करत आहे. शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात सुरु असलेल्या या संघर्षावर अद्यापही तोडगा निघाला नाही. केंद्र सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करुन तोडगा काढण्याचा प्रयत्न करते आहे. परंतू, शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यामुळे केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यात सुरु असलेली चर्चेची आठवी फेरीही निष्फळ ठरली आहे. आता पुन्हा येत्या 15 जानेवारीला नववी बैठक होणार आहे. दरम्यान, न्यायालयात काही याचिका दाखल झाल्या आहेत. या याचिकांमध्ये शेती हा विषय राज्य सरकारांच्या अखत्यारीत आहेत. त्यामुळे त्याबाबत कायदे करण्याचा अधिकार केंद्र सरकारला नाही. या याचिकांवर येत्या 11 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
भंडारा जिल्ह्यासाठी शनिवारची पाहाट काळरात्र ठरली. रात्रीच्या नीरव अंधारात सर्व काही निद्राधीन असताना काळाने घाला घातला. भंडारा जिल्हा रुग्णालयातील शिशु केअर युनिटला आग लागली. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेत 10 बालकांचा मृत्यू झाला. रात्री दोन वाजनेच्या सुमारास ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.
अखिल भारतीय साहित्य संमेलन आणि वाद हे समिकरण जुने झाले आहे. यंदाच्या 94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आयोजनावरुनही वाद पाहायला मिळाला. हा वाद संमेलनाच्या स्थळावरुन होता. संमेलन दिल्ली की नाशिक असा हा वाद होता. अखेर 94 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन हे नाशिक येथेच घेण्यात येईल असे महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी शुक्रवारी सांगितले.
दरम्यान, राजकारण, अर्थकारण, सामाजकारण, संस्कृती, कृषी आरोग्य, संशोधन, उद्योग यांसह जगभरातील घटना, घडामोडींचा ताजा तपशील जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉग पाहात राहा. लेटेस्टली सोबत जोडलेले राहा.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)