Bank Unions Strike: बँकांच्या खासगीकरणाविरोधात बँक कर्मचारी संघटनांकडून दोन दिवसांच्या संपाची हाक; 9 फेब्रुवारीच्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

10 Feb, 05:27 (IST)

बँकांच्या खासगीकरणाविरोधात बँक कर्मचारी संघटनांकडून दोन दिवसांच्या संपाची हाक देण्यात आली आहे. हा संप 15 मार्च पासून सुरु होईल.

10 Feb, 04:56 (IST)

भूवनेश्वरच्या रस्त्यावर आज प्रवासी आणि नागरिकांना रस्त्यावर यमराज दिसला. एका कलाकाराने रहदारीच्या नियमांबाबत जनजागृती करण्यासाठी चक्क यमराजाचा वेश परिधान केला आणि जनजागृती केली.

10 Feb, 04:43 (IST)

जेडी (एस) एमएलसी बसवराज होरट्टी यांची आज कर्नाटक विधानपरिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

10 Feb, 04:14 (IST)

बलात्कार प्रकरणातील 52 वर्षीय गुन्हेगारास 15 वर्षांची शिक्षा ठोठाविण्यात आली आहे. मध्यप्रदेशमधील जबलपूर कोर्टाने अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात दोषीला ही शिक्षा ठोठावली.

10 Feb, 03:59 (IST)

पुणे येथील गोल्डमॅन सचिन नाना शिंदे याचा खून करण्यात आला आहे. पुणे नगर रस्त्यावर लोणीकंद येथे अॅक्सीस बँकेसमोर अज्ञातांनी गोळ्या झाडून हा खून केला. सचिन शिंदे यांच्यावर पोलीस ठाण्यांमध्ये विविध गुन्हेही दाखल होते

10 Feb, 03:42 (IST)

व्हिडिओच्या माध्यमातून महिलांविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या एका आरोपीला चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या जवानांनी अटक केले आहे. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या दुसऱ्या आरोपीचा तपास घेणे सुरू आहे. या सर्व कारवाईसोबतच मुंबई पोलिसांनी इशाराही दिला आहे. आदर कराल तर आदर मिळेल', नाहीतर शिक्षा होईल, असे मुंबई पोलीसांनी म्हटले आहे.

10 Feb, 03:14 (IST)

जनता सेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण यांनी घेतली गृहमंत्री अमित शाह यांची दिल्ली येथे भेट घेतली.

10 Feb, 03:07 (IST)

नवी मुंबई येथे अपघातात दोन पोलीस पाल्याचे निधन झाले. वेदनादायी घटना आहे.पोलिसांना सदर गुन्ह्याचा तपास काटेकोरपणे करून भक्कम पुराव्यासहित न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. पोलीस उपायुक्तांना स्वतः पर्यवेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.

10 Feb, 02:25 (IST)

ठाण्यातील मुलुंड चेकनाका परिसरात मॉडेल कॉलनीला आग लागल्याचे वृत्त आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत. अद्याप कोणतीही जीवीत हानी झाल्याचे वृत्त नाही.

10 Feb, 02:21 (IST)

भाजप खासदार नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या चर्चेवर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. नारायण राणेंसारख्या एका नॉन मॅट्रिक माणसाला देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपद देण्याची वेळ आली, तर ते सिंधुदुर्गाचं दुर्दैव असेल, अशी टीका विनायक राऊत यांनी केली आहे.

10 Feb, 01:42 (IST)

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 2,515 जणांना कोरोनाची लागण झाली. तर 35 जणांचा मृत्यू झाला. 2,554 जणांना डिस्चार्ज मिळाला अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. आरोग्य विभागाने दिलेला तपशील खालीलप्रमाणे.

Total cases: 20,48,802
Total recoveries: 19,61,525
Active cases: 34,640
Death toll: 51,360

10 Feb, 01:26 (IST)

अर्थसंकल्पीयी चर्चेवेळी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी भाषण करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

10 Feb, 01:02 (IST)

काँग्रेस आमदार अदिती सिंह यांनी राम मंदिरासाठी 51 लाख रुपयांची देणगी दिली आहे.

10 Feb, 24:40 (IST)

उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यात हिमनदी कोसळून दुर्घटना घडली. या दुर्घटनेत अडकलेल्यांचा बचाव आणि मदतकार्य अद्यापही सुरुच आहे.

10 Feb, 24:24 (IST)

अभिनेता राजीव कपूर यांच्यावर मुंबई येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

10 Feb, 24:12 (IST)

कोयंबटूरः थेप्पकडू, मेट्टूपलायम येथे मंदिरातील हत्तींसाठी 48 दिवसीय कायाकल्प शिबिर सुरू आहे. तामिळनाडूच्या या शिबिरात 26 हत्ती सहभागी होत आहेत

09 Feb, 23:59 (IST)

चंदीगड काँग्रेस कमेटी अध्यक्षपदी सुभाष चावला यांची निवड झाली आहे. काँग्रेसने ही घोषणा केली.

09 Feb, 23:30 (IST)

सीटी बँक घोटाळा प्रकरणी शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांची ईडीकडून चौकशी केली जात आहे. वडनेरा येथील आमदार रवी राणा यांनी दिलेल्या तक्रारीवरुन ही चौकशी केली जात असल्याचे प्रतामिक वृत्त आहे.

09 Feb, 23:27 (IST)

उत्तराखंड राज्यातील चमोली येथील हिमनदी दुर्घटनेत अडकलेल्या महिलांच्या एका गटाचा संपर्त तुटला आहे. या परिसरात आशा कार्यकर्ता असलेल्या महिलेने सांगितले की, ही घटना घडील तेव्हा मी जोशीमठ येथे होते. आता मी माझ्या कुटुंबीयांकडे कशी जाऊ असाही सवाल या महिलेने विचारला आहे. एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे.

09 Feb, 22:55 (IST)

पाकिस्तानातील नातेवाईकास भेटायला गेलेल्या आणि अटक झाल्याने पाकिस्तानातील कोठडीत तब्बल 18 वर्षे खितपत पडलेल्या हसिना बेगम या भारतात नुकत्याच आल्या होत्या. याच हसिना बेगम यांचे निधन झाले आहे. मायभूमी औरंगाबाद येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 65 वर्षांच्या होत्या.

Read more


उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात हिमकळा तुटल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या 26 जणांचे मृतदेह सापडले आहेत. मात्र, अद्यापही 170 जण बेपत्ता असल्याचं संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आयटीबीपी तसेच इतर बचाव कार्य संस्था या बेपत्ता लोकांचा तपास करत आहेत. या दुर्घटनेत मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोकण दौऱ्यावर असताना शिवसेनेवर टीका केली होती. आम्ही तुमच्या मार्गाने चाललो असतो, तर तुमचं अस्तित्वच शिल्लक राहिलं नसतं, असं अमित शहा यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज शिवसेनेने सामना अग्रलेखातून शहा यांना प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेनेचे अस्तित्व संपविण्याची भाषा ज्यांनी केली त्यांच्या गोवऱ्या महाराष्ट्राने स्मशानात पोहोचवून त्यांचे जिवंतपणीच श्राद्धे घातलं, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

तर दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. याचा फटना सर्वसामान्यांना बसत आहे. आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती पुन्हा वाढल्या आहेत. आज नवी दिल्लीत पेट्रोलच्या दरात 35 पैशांची वाढ झाली असून मुंबईत पेट्रोलचे दर 34 पैशांनी वाढले आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now